वाल्मिक कराडच्या नावाने धक्कादायक बॅनर व्हायरल, थेट स्कॅनर देत म्हटले, एक दिवस…

Beed News : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एक नाव तूफान चर्चेत आहे. देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आली. कराडचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्येच सध्या सोशल मीडियावर हैराण करणारे बॅनर व्हायरल होत आहे.

वाल्मिक कराडच्या नावाने धक्कादायक बॅनर व्हायरल, थेट स्कॅनर देत म्हटले, एक दिवस...
Walmik Karad banner
| Updated on: Oct 06, 2025 | 8:37 AM

अशोक काळकुटे बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हेच नाही तर देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक माहराणीची व्हिडीओ देखील पुढे आली. देशमुखांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाली. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. संतोष देशमुख प्रकरणानंतर वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत आहे. बीडच्या तुरूंगात वाल्मिक कराड असून त्याच्या नावाने एक बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक आण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा.

तेव्हाच आण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आह. सोबत फोन पे चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे. जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे. या व्हायरल होणाऱ्या बॅनरमुळे एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. संदिप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती.

अशा खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपींचं खुलेआम समर्थन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लोकांमधून होत आहे. तर याच संदिप तांदळेच्या नावाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्या दरम्यान निधी गोळा करण्यात आल्याची माहिती आहे आणि तसे बॅनर सोशल माध्यमांवर अशाच प्रकारे व्हायरल झाले होते. ज्या बॅनरवर वाल्मिक कराडचा देखील फोटो होता.