AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरूंगात वाल्मिक कराड, घुलेला मारहाण; मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय

वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

तुरूंगात वाल्मिक कराड, घुलेला मारहाण; मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2025 | 4:12 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या  वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत, तिथेच त्यांना मारहाण झाल्याची बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणात आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाली असल्याची माहिती आहे. त्या संदर्भात आपल्याला काही माहिती नाही. ते आता जेल प्रशासनाला माहिती असेल.  काय प्रकार झाला आहे,  काय घडल आहे?  ज्याबद्दल माहितीच नाही त्याबद्दल अधिकृत भूमिका आपण सांगणं बरोबर नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज काय झालं की नाही झालं की अफवा उठवली, याबद्दल कल्पना नाही. हे आरोपी सोंग करणारे आहेत. जोपर्यंत अधिकृत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. ते झालं की नाही झालं माहीत नाही पण ते सोंग असू शकतं. जेलमध्ये जर गँगवार झालं असेल, प्रक्रिया सुरू असेल तर ते एखाद्या वेळेस खरंही असू शकतं. तातडीने खटला चालून संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सध्या सुनावणी सुरू आहे, या हत्याप्रकरणात सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच  मास्टरमांईंड असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. सध्या वाल्मिक कराड हा बीडच्या कारागृहात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...