धक्कादायक! मतदानाच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव

| Updated on: Jan 15, 2021 | 8:19 PM

मतदानाला काही तास शिल्लक असताना उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

धक्कादायक! मतदानाच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव
Follow us on

सोलापूर : राज्यात सगळीकडे आज ग्रामपंचाय निवडणुकांसाठी मदतान पार पडत आहे. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून उमेदवाराचाच मृत्यू झाल्याने अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. (Shocking Candidate dies on polling day of Gram Panchayat Elections 2021 of heart attack)

मिळालेल्या माहितीनुसार, खैराट इथली ही घटना असून सायबण्णा बिराजदार असं मयत उमेदवाराचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून विजयी होण्यासाठी सायबण्णा बिराजदार यांनी वार्डातील प्रत्येक घर पिंजून काढलं होतं. गावातील प्रत्येकाशी चर्चा केली. आपल्याला मत मिळावं आणि विजयी व्हाव यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ऐन मतदानाच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सायबण्णा बिराजदार यांनी निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सकाळ-संध्याकाळ प्रचारात मग्न होते. पण हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने काल खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तब्येत आणखी खालावल्याने मतदानाच्या दिवशीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि समर्थकांमध्येही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज 15 जानेवारीला मतदान होत आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. तर, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. (Shocking Candidate dies on polling day of Gram Panchayat Elections 2021 of heart attack)

संबंधित बातम्या – 

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: गुलाबराव पाटलांच्या गावात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना’, शिवसैनिक स्वकियांविरोधात मैदानात

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावात बाचाबाची, पोलिसांकडून लाठीचार्ज

(Shocking Candidate dies on polling day of Gram Panchayat Elections 2021 of heart attack)