बाभळीच्या झाडाला माजी सरपंच आणि इतर 2 जणांचा फोटो..लिंब, खिळे, बाहूली…पुणे जिल्हातील धक्कादायक प्रकार

Pune News : माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि इतर 2 जणांच्या फोटोला लिंबु, बिबवासह काळी बाहुली खिळ्यांनी ठोकल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला. ज्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

बाभळीच्या झाडाला माजी सरपंच आणि इतर 2 जणांचा फोटो..लिंब, खिळे, बाहूली...पुणे जिल्हातील धक्कादायक प्रकार
pune
| Updated on: Aug 01, 2025 | 1:04 PM

पुणे : पुण्याच्या राजगड तालुक्यातील हिरपोडी गावात एक अतिशय धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय. चक्क अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा अघोरी प्रकार पुढे आल्याने संपूर्ण गावात एक भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. करणी करण्याच्या उद्देशाने गावातील एका राईस मिलच्या मागे शेतात असणाऱ्या एका बाभळीच्या झाडाला हा अघोरी प्रकार केल्याचे पुढे आले. या बाभळीच्या झाडाला दोन फोटो देखील लावण्यात आली होती.

पुण्याच्या हिरपोडी गावाता धक्कादायक प्रकार गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण 

गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि इतर 2 जणांच्या फोटोला लिंबु, बिबवासह काळी बाहुली खिळ्यांनी ठोकल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला. फक्त हेच नाही तर आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंब आणि हळदी कुंकू दिसून आले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. गावातील शेतकरी सकाळी आपल्या शेतात जात असताना त्यांनी हा सर्व धक्कादायक प्रकार बघितला.

गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि इतर 2 जणांचा फोटो लावत करणीचा प्रकार 

या बाभळीच्या झाडाकडे लक्ष गेल्यानंतर करणीबद्दल शेतकऱ्याने ही माहिती गावात दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याठिकाणी जात,  झाडावर लावलेले खिळे, लिंब आणि इतर सामान काढून सामान जाळून टाकले. फक्त फोटो, लिंबू, बिबे, तेलाच्या बाटल्या, लिंब, हळदी, कुंकू असे सर्व साहित्य काढून थेट जाळून टाकले.

गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पोलिसांना देणार तक्रार 

मात्र, ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. घडलेल्या या प्रकाराची त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलीय. गावाच्या परिसरात वारंवार घडणारे असे प्रकार रोखण्यासाठी गावकरी याविरोधात पोलीसात तक्रारही देणार आहेत. यापूर्वी देखील गावात अशाप्रकारची घटना घडली असल्याची माहिती मिळतंय. आता पोलिस या प्रकरणी काय कारवाई करतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. गावातीलच कोणीतरी हा प्रकार करत असल्याचा एक अंदाज असल्याने हा व्यक्ती कोण याचा शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.