AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! अशोक खरातने 5 नरबळी दिले? महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर

मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक प्रकरणातील भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी! अशोक खरातने 5 नरबळी दिले? महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर
ASHOK KHARATImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 4:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक प्रकरणातील भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी खळबळजनक दावा केला आहे. अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारी वकिलांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे.  एका पीडित महिलेनं भोंदू जोतिषी अशोक खरात विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि हे संपूर्ण धक्कादायक प्रकारण समोर आलं आहे. अशोक खरातचं बिंग फुटलं. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 100 व्हिडीओ सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी वकिलांकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं सरकारी वकिलांनी? 

अशोक खरातच्या घराची झडती घेण्यात आली, त्याने बंदुकीच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याच्या  मालमत्तासंबंधित कागदपत्रे मिळाले आहेत, अनेकांना त्याने फसविले आहे, त्याच्याविरोधात अनेक तक्रारी पुढे येत आहेत. झडतीच्यावेळी पिस्टल जप्त करण्यात आलं असून, त्याने याच पिस्टलच्या माध्यमातून 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे. या प्रकरणात अत्याचाराचे काही व्हिडीओ समोर आले असून, आरोपी हा 67 वर्षांचा आहे, तो या व्हिडीओमध्ये 30 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करतांना दिसतो, असा दावा वकिलांनी केला आहे.

हरणाची शिकार केल्याचा देखील संशय

दरम्यान आरोपी अशोक खरात याने अनेकांना कस्तुरी दिली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. या कस्तुरीसाठी त्याने हरणाची शिकार केल्याचा संशय आहे. तो साप कुठून आणत होता, याचा देखील तपास करायचा आहे, लैंगिक अत्याचार प्रकरणात डिजिटल पुरावे जमा करायचे आहेत, त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयानं  पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार