नाथाभाऊंचा जावई प्रांजल खेवलकरच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती, TV9 च्या हाती रिपोर्ट…

Pranjal Khewalkar Forensic Report : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली होती. काही दिवस पुण्यातील जेलमध्ये राहण्याची वेळही त्यांच्यावर आली. पुणे पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले होते. आता मोठा खुलासा नुकताच झालाय.

नाथाभाऊंचा जावई प्रांजल खेवलकरच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती, TV9 च्या हाती रिपोर्ट...
Pranjal Khewalkar
| Updated on: Oct 06, 2025 | 12:51 PM

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागात पार्टी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. नाथाभाऊंच्या जावयाला पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केल्याने राज्यातील राजकारणात मोठा भूंकप आला. यादरम्यान काही गंभीर आरोप करण्यात आली. रोहिणी खडसे या पतीच्या बचावासाठी स्वत: मैदानात उतरल्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप करत थेट म्हटले की, त्यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ सापडली आहेत. काही व्हिडीओमध्ये स्वत: प्रांजल खेवलकर दिसत आहेत. महिलांना चित्रपटांमध्ये काम करण्याचे आमिष दाखवून त्यांना अशाप्रकारच्या पार्टीमध्ये बोलावले जायचे, असा आरोप त्यांनी केला.

आता प्रांजल खेवलकर प्रकरणाला वेगळे वळण आलंय. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट TV9 च्या हाती लागला आहे. खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलरला 27/7/2025 ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर खेवलकरचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवण्यात आले होते. आता याच रिपोर्टनंतर खळबळ उडाली असून मोठी माहिती पुढे आली. यामुळे खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट दिसतंय.

रिपोर्टनुसार, प्रांजल खेवलकरने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचे या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हणण्यात आले. फक्त खेवलकरच नाही तर याचसोबत गुन्ह्यातील अन्य चार पुरुष आणि दोन महिलांनी देखील ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे. खराडी भागात सुरू असलेल्या पार्टीमध्ये ड्रग्स सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. शिवाय आरोपींनी ड्रग्सचे सेवन केल्याचेही बोलले जात होते.

आता फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले की, पार्टीतील कोणत्याही आरोपीने ड्रग्सचे सेवन केले नव्हते. एकनाथ खडसे यांनी स्पष्ट म्हटले होते की, माझ्या जावयाने त्याच्या पूर्ण आयुष्यात कधीच ड्रग्सचे सेवन केले नाही. जावई प्रांजल खेवलकर याला फसवले जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी फार अगोदर केला होता. काही दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकरला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामध्येच आता हा रिपोर्टही पुढे आलाय.