गर्भवती गर्लफ्रेंडच्या कोल्ड्रिंकमध्ये बॉयफ्रेंडने टाकल्या डांबराच्या गोळ्या, कोल्ड्रिंक पिताच… धक्कादायक घटना

प्रेयसीला दिवस गेलेले असताना प्रियकराने तिला थेट शीतपेयात गोळ्या घालून पिण्यास दिल्या. ज्यानंतर तिला काही वेळातच त्रास होण्यास सुरूवात झाली. दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली होती. त्यानंतर त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.

गर्भवती गर्लफ्रेंडच्या कोल्ड्रिंकमध्ये बॉयफ्रेंडने टाकल्या डांबराच्या गोळ्या, कोल्ड्रिंक पिताच... धक्कादायक घटना
Mumbai police
| Updated on: Aug 30, 2026 | 8:19 AM

चारित्र्यावरील संशयातून दोन ते अडीच महिन्यांच्या गरोदर प्रेयसीची हत्या करण्यात आली. मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीने प्रेयसीला मारण्याचा सर्व कट रचला होता. आरोपी प्रियकराला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. 25 तारखेला महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा वाद झाला. वाद शांत झाल्यानंतर प्रियकराने तिला थेट शीतपेय प्यायला दिले. त्यात विष असेल याची कोणतीही कल्पना महिलेला नव्हती. तिने ते शीतपेय पिले. ते पिताच तिला प्रचंड त्रास सुरू झाला. तिला उलट्या होत होत्या. सुरवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केले पण जेव्हा त्रास वाढला आणि ती चक्कर येऊन पडली, तेव्हा कुटुंबियांना संशय आला. कुटुंबियांनी तिला आधी खासगी आणि मग शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, तिला मयत घोषित करण्यात आले.

प्रियकर आशिष मगर याने आपल्याला शीतपेय दिल्याचे आणि त्यानंतर आपल्याला त्रास सुरू झाल्याचे तिने घरच्यांना सांगितले. सुरवातीला आशिषने पोलिसांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. डॉक्टरांनी देखील विषबाधने महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तवला.

पाच दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली. प्रेयसीला दिवस गेलेले असताना त्याने कोल्ड्रिंकमध्ये डांबरच्या गोळ्या मिक्स करून तिला ते पिण्यास दिले. त्यानंतर तिला त्रास सुरू झाला आणि तिचा जीव गेला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलिसांकडून आरोपीची कसून चाैकशी केली जात आहे.

कल्याण पूर्वेत एटीएम ग्राहकांना लुटण्यासाठी चोरट्यांनी एक नवा फंडा शोधून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएम मशीनमध्ये फेविक्विक लावून ग्राहकांचे कार्ड अडकवायचे, त्यानंतर बनावट हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून मदतीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करायची, अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या टोळीचा डाव उधळला गेला असून एका संशयिताला पकडून कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Follow Us