कपडे काढा मला टोटका करायचाय; पत्नी आणि सासूला केलं निर्वस्त्र अन् मग…, मुंबईत काळ्या जादूचा आघोरी खेळ
अंधश्रद्धा माणसाला काहीही करायला लावू शकते, असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईमधून समोर आला आहे. या व्यक्तीनं अंधश्रद्धेपोटी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रकरण कळताच पोलीसही हादरले आहेत.

अंधश्रद्धा माणसाला काहीही करायला लावू शकते, असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईमधून समोर आला आहे. या व्यक्तीनं अंधश्रद्धेपोटी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, नवी मुंबईमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. काळ्या जादूसाठी एका तरुणानं आपली सासू आणि पत्नीसोबत जे केलं त्या प्रकारानं पोलीसही हादरले आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण?
रमेश असं या व्यक्तीचं नाव आहे, तो मुळचा उत्तर प्रदेश येथील देवरियाचा रहिवासी आहे. तो आपली पत्नी आणि सासूसोबत नवी मुंबईमध्ये घर भाड्यानं घेऊन राहातो. रमेशचा स्वभाव पहिल्यापासूनच थोडा विचित्र होता. मात्र एप्रिल महिन्यात तो असं काही बोलला ज्यामुळे त्याची पत्नी राधा आणि सासू सरिता यांना प्रचंड धक्का बसला. राधाच्या छोट्या भावाचं लग्न जमत नव्हतं, त्याचं लग्न लवकर होण्यासाठी आपल्याला एक खास उपाय करावा लागेल असं त्याने आपली पत्नी आणि सासूला सांगितलं.जर राधाच्या भावाचं म्हणजे त्याच्या मेव्हण्याचं लग्न लवकर जमवायचं असेल तर तुम्हाला तुमचे कपडे काढावे लागतील असं त्याने आपल्या सासूला आणि पत्नी सांगितलं.
रमेश एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या पत्नीला आणि सासूला निर्वस्त्र केलं, हा मी करत असलेल्या टोटक्याचाच भाग असल्याचं त्याने आपल्या सासूला आणि पत्नीला सांगितलं. भीतीमुळे रमेशची सासू आणि त्याची पत्नी या गोष्टीला तयार झाल्या, कारण त्यांनाही वाटत होतं आपल्या मुलाचं लवकर लग्न व्हावं, मात्र रमेशच्या मनात वेगळंच काहीतरी होतं, त्याने या दोघींचे अश्लील फोटो काढले.
त्यानंतर त्याने आपली पत्नी आणि सासू यांना ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की तू जर माझं ऐकलं नाही तर मी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल. त्यानंतर रमेशने आपल्या बायकोला अजमेरला बोलावं, त्याची पत्नी अजमेरला आली देखील, मात्र तरीही त्याने तिचे फोटो तिच्या वडिलांना आणी भावाला पाठवले. ही गोष्ट राधाला कळताच अखेर तिने आपल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे, घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.