बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर आरोप, खासदार पूत्र..

बीडच्या विलास घुले खून प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता पीडित महिला पुढे आल्याने प्रकरणात वेगळेच वळण लागले. मात्र, ही महिला इतके दिवस नक्की शांत कशामुळे होती, हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर आरोप, खासदार पूत्र..
Vilas Ghule case
| Updated on: Jun 29, 2026 | 9:34 AM

बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा साैरभ बजरंग सोनवणे यांचे नाव थेट विलास घुले खून प्रकरणात आल्याने एकच खळबळ उडाली. एसआयटीकडून साैरभ बजरंग सोनवणे याची काही तास चाैकशी देखील झाली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. विलास घुले खून प्रकरणानंतर एकच मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मोठी माहिती पुढे येतंय. विलास घुले खून प्रकरणाचे मुळ कारण आता पुढे आले. विलास घुलेचा मित्र उमेश मानेने व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आहे. पीडित महिलेने म्हटले की, 3 तारखेला विलास घुले म्हणाला होता की, संबंध न ठेवल्यास तुझ्या लेकरांना किंवा तुझ्या नवऱ्याला मारून टाकू, यानंतर 20 तारखेला देखील घरासमोर येऊन हॉर्न मारून शिवीगाळ केला. त्याला समजावण्यासाठी माझे वडील, नवरा आणि नातेवाईक तेथे गेले होते. तेव्हा त्यांनी काचेच्या बॉटल आणि विटांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर माझ्या वडिलांनी हात उचलला आणि यातून ही घटना घडली.

रमेश घुलेने आम्हाला धमकावल्याने आम्ही आजपर्यंत पोलिसात गेलो नाही, पोलिसांनी माझी तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्यावा. उमेश माने याने माझ्यासोबत बळजबरी केली, अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ केले. व्हिडिओ व्हायरल करीन असे म्हणून ब्लॅकमेल केले आणि पुन्हा अत्याचार केला. ही घटना मी घरच्यांना सांगितली, पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाणार होतो.

रमेश घुलेने आम्हाला धमकावले, यापुढे असे होणार नाही याची जिम्मेदारी त्याने घेतली आणि जर तक्रार द्यायला गेलात तर तुमचं काही खरं नाही असं म्हणाला. आम्ही शेतात राहत होतो, त्यानंतर गावात राहायला गेलोत. त्यानंतरही उमेश माने आणि विलास घुले बुलेट आणि चार चाकी काळ्या स्कॉर्पिओने येऊन त्रास द्यायचे.  3 जून रोजी विलास घुले म्हणाला तू आहे तसे संबंध ठेव नाही तर तुझ्या लेकरांचा आणि नवऱ्याचा जीव घेईल.

उमेश माने आणि विलास घुले 20 तारखेला पुन्हा घरी आले हॉर्न मारू लागले आणि शिवीगाळ करू लागले. माझ्या नवऱ्याने सांगितले आम्हाला सुखाने जगू द्या. त्यावर तू बाहेर आल्यानंतर तुला खाल्लास करणार अशी धमकी दिली. सगळेजण पुन्हा समजावून सांगण्यासाठी हॉटेलवर गेले होते, तेथे काचेच्या बॉटल, विटाच्या तुकड्याने मारहाण करू लागले.

त्यांनी अगोदर मारहाण सुरू केल्याने वडिलांनी हात उचलला. केजमध्ये आणि बीडला गेलो होतो पण आमची अजूनपर्यंत तक्रार घेतलेली नाही तरी तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्यावा. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. बीड खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेऊन आरोपींनी विलास घुले याचा खून केला. आमचे कोणीही काहीही करू शकत नाही, असेही आरोपी व्हिडीओमध्ये म्हणताना दिसले. या प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत.

Follow Us