AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने 24 तास उघडी ठेवता येणार

राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना आता २४ तास खुले ठेवण्याची सुट देण्यात आली आहे.या सूटमधून मद्यविक्री करणारी आणि मद्य पुरवणाऱ्या आस्थापनांना वगळण्यात आले आहे.

राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने 24 तास उघडी ठेवता येणार
| Updated on: Oct 01, 2025 | 10:45 PM
Share

राज्यातील दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने वगळून इतर सर्व आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई हे कधीही न झोपणारे शहर म्हटले जात होते. परंतू आता संपूर्ण महाराष्ट्रातच २४ तास दुकाने सुरु ठेवण्याची मंजूरी देण्यात आली आहे.

राज्यात आता नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू ठेवण्याची सूट राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करुन देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २ (२) मध्ये “दिवस” याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरु होणारा चोवीस तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच या अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल अशी तरतूद केली आहे.

या अधिनियमाच्या तरतूदींनुसार केवळ परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते, तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि  बंद करण्याच्या वेळा निश्चित झाल्या आहेत. तसेच उपरोक्त कलम १६ (१) (ख) मधील तरतुदीस अधीन राहून मद्य पुरवठा/विक्री करणा-या आस्थापना वगळून इतर आस्थापना २४ तास सुरु ठेवता येतील असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

मद्य विक्री आणि मद्य पुरविणाऱ्या आस्थापनांना वगळले

मात्र, शासनाने दिनांक १९/१२/२०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यातील विविध क्षेत्रातील मद्य विक्री आणि मद्य पुरविणा-या आस्थापनांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केलेल्या असल्यामुळे, अशा आस्थापना २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत असेही राज्य सरकारने अध्यादेशात म्हटले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी