Petrol- Diesel Shortage : नागपूरकरांनो पेट्रोल जरा जपूनच वापरा, तिसऱ्या दिवशीही टंचाई भासणार

| Updated on: Jun 01, 2022 | 11:47 AM

शहरातील जवळपास 50 हून अधिक पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे. इंधन टंचाई ही काही एक दिवसापूरती नाही तर तीन दिवसांपासून पेट्रोलपंपावरुन वाहनधारकांना माघारी परतावे लागत आहे. तेल कंपन्यांकडूनच पुरवठा होत नसल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे. नागपूर पेट्रोल पंप संचालक आणि पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन देखील तोडगा निघालेला नाही.

Petrol- Diesel Shortage : नागपूरकरांनो पेट्रोल जरा जपूनच वापरा, तिसऱ्या दिवशीही टंचाई भासणार
Follow us on

नागपूर : नागपूरकरांनो जर तुम्ही रोजच्या प्रमाणे आपली दुचाकी -किंवा चार चाकी घेऊन घराबाहेर पडणार असताल तर आपल्या वाहनातील (Petrol-Diesel) पेट्रोल-डिझेलचा अंदाज घेऊनच. शिवाय विनाकारण घराबाहेर पडल्यानेही तुमची चांगलीच अडचण होऊ शकते. कारण गेल्या काही दिवसांपासून (Nagpur) नागपूर शहरात पेट्रोल-डिझेलची टंचाई भासत आहेच.त्यामुळे पेट्रोल-डिझेल जरा जपूनच वापरावे लागणार आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी शहारातील तब्बल 50 हून अधिक (Petrol pump) पेट्रोलपंप हे बंद राहणार आहेत. तेल कंपन्यांकडून या इंधनाचा पुरवठा होत नसल्याने ही वेळ आली. शिवाय असाच पुरवठा होत गेला तर विक्रीवर काही निर्बंधही येऊ शकतात हे ही तेवढेच खरे आहे.

वाहनधारकांना मनस्ताप

शहरातील जवळपास 50 हून अधिक पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे. इंधन टंचाई ही काही एक दिवसापूरती नाही तर तीन दिवसांपासून पेट्रोलपंपावरुन वाहनधारकांना माघारी परतावे लागत आहे. तेल कंपन्यांकडूनच पुरवठा होत नसल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे. नागपूर पेट्रोल पंप संचालक आणि पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन देखील तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अधिकतर पेट्रोपंपावर नो पेट्रोल-डिझेल असे फलक पाहून वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नो पर्चेसच्या निर्णयामुळे आज टंचाई

इंधन दर कपातीमुळे पेट्रोलपंप चालक-मालक यांनी आक्रमकपणा दाखवत 31 मे रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी केली गेली नाही. यासंदर्भात फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी माहिती दिली होती. त्यामुळे आज म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या दिवशी शहरात पेट्रोल-डिझेलची टंचाई भासली आहे. केवळ नागपूरातच नव्हे तर अमरावती, लातूर, बीड या जिल्ह्यामध्येही टंचाई भासत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्यानंतरच ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे सुरळीत पुरवठा केव्हा होणार या प्रतिक्षेत नागपूरकर आहेत.

हे सुद्धा वाचा

अॅडव्हान्स पैसे तरीही समस्या कायम

दिवसेंदिवस वाहनधारकांची होणारी गैरसोय पाहता पेट्रोल चालकांनी ॲडव्हान्स पैसे देऊन इंधन खरेदीचा करण्यची तयारी दर्शवली होती. असे असतानाही वेळेत पुरवठा झालेला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही समस्या कायम आहे. शिवाय इंधन टंचाईचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार हा प्रश्न आहे.