AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्कम टॅक्सकडून नोटीस मिळाल्याच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…

श्रीकांत शिंदे यांना आयकर नोटीस मिळाल्याच्या वृत्तांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानंतर हे वृत्त पसरले होते. मात्र, शिंदे यांनी आणि सरकारी सूत्रांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

इन्कम टॅक्सकडून नोटीस मिळाल्याच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Shrikant Shinde
| Updated on: Jul 11, 2025 | 12:44 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री आणि शिंदे यांचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनीच श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं विधान केलं होते. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेनेचे मंत्री आणि शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानामुळे या चर्चांना सुरुवात झाली. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना मला आणि श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे म्हटले होते. संजय शिरसाट यांना २०१९ ते २०२४ या कालावधीतील त्यांच्या संपत्तीतील वाढीबद्दल प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचे त्यांनी नमूद केल्याने उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय शिरसाट यांच्या विधानानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. त्यांच्या सुरुवातीच्या विधानानंतर लगेचच त्यांनी यू-टर्न घेतला. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाने कोणतीही नोटीस बजावलेली नाही.

श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण

आता या सर्व घडामोडींवर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. काही प्रसारमाध्यमांनी संजय शिरसाट यांच्या तोंडी हे वाक्य घालून त्याचा विपर्यास केल्याचा दावाही श्रीकांत शिंदेंनी केला. यावरून स्पष्ट होते की खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही नोटीस आलेली नाही.

एकनाथ शिंदे दिल्लीत

दरम्यान त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री तडकाफडकी दिल्लीला गेले होते. काल ते राज्यात परतले. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीतील कुरबुरी, आगामी निवडणुका, ठाकरे बंधूंचे पुन्हा एकत्र येणं तसेच अतंर्गत मतभेद यावरही त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती येत आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.