पुणे बंद पाडून दाखवाच…; MPSC आंदोलनावरून महापौरांचं खुलं आव्हान, ‘ती’ एक शंकाही बोलून दाखवली

Pune Mayor Challenge MPSC student Protest: पुणे बंद केलं तर पुणेकर काय आहेत कळेल, असे म्हणत MPSC आंदोलनावरून महापौर मंजुषा नागपुरेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुणे बंद पाडून दाखवाच...; MPSC आंदोलनावरून महापौरांचं खुलं आव्हान, ती एक शंकाही बोलून दाखवली
| Updated on: Oct 06, 2026 | 7:40 PM

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. मात्र याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच आता या प्रकरणी पुण्याच्या महापौरांनी आंदोलकांना खुलं आव्हान दिले आहे. यामुळे राजकारण अजून तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अभिजीत दिपकेंनी महाराष्ट्रातील सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांनी पुण्यात यावं. तसेच पुणे बंद पाडावं, असं आवाहन केलं होतं. यावरून आता वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या आवाहनावरून महापौरांनी विद्यार्थ्यांना थेट आव्हान दिले आहे.

एमपीए सी विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून पुणे शहर बंद पाडण्याची टोकाची भूमिका आंदोलकांनी घेतली होता. यावर उत्तर देण्यासाठी आता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, पुणे शहर विद्येचे माहेर आहे. लाखो मुलं शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात. पुण्यात शिकलेले विद्यार्थी ७० टक्के इथे स्थायित झाले आहेत पुणेकर झाले आहेत. पुणे शहराने विद्यार्थ्यांना कायम मायेची उब दिली आहे. आजपर्यंत विद्यार्थ्यांनी पण पुण्याला त्रास दिला नाही. मात्र रोहित पवार यांनी शहर बंद पाडण्याचे विधान केलं आहे, असं त्या म्हणाल्या.

Loading...

महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की, रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी पुणे बंद पाडून दाखवावे. कॉलेजचे विद्यार्थी पोहचू शकत नाहीत, रुग्ण रुग्णालयात पोहचू शकत नाही. पुणेकर काय आहेत हे आता त्यांना कळेल. विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. त्यांनी त्यांचं करिअर घडवावे. ज्या पक्षाला राजकीय स्कोर घडवायचा आहे त्यांच्या नादी लागू नये, अशी प्रतिक्रिया पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.

त्यांनी एक शंका उपस्थित केली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आज जे आंदोलन सुरू आहे ते विद्यार्थी नसावेत असं मला वाटतं. शरद पवार, सुप्रिया सुळे पुण्यात राहतात. त्यांना योग्य वाटते आहे का की पुणे शहर बंद पाडणे? असा प्रश्न सुद्धा महापौर यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना भूमिका मांडण्याचा, मागणी करण्याचा अधिकार आहे. पुणेकरांना कुठला ही त्रास होऊ नये एवढाच मुद्दा आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आता यावर रोहित पवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us