मोठा खुलासा! केतनला धक्का दिल्यानंतर या व्यक्तीला केला सियाने पहिला फोन, थेट 15 मिनिटे..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यानच आता अत्यंत मोठी माहिती पुढे आली. पोलिस तपासात ही माहिती पुढे आली. ज्याने एक खळबळ उडाली आहे.

मोठा खुलासा! केतनला धक्का दिल्यानंतर या व्यक्तीला केला सियाने पहिला फोन, थेट 15 मिनिटे..
Ketan Agarwal case
| Updated on: Jun 28, 2026 | 9:34 AM

लोहगडावरून 400 फूट खोल दरीत होणारा पती केतन अग्रवाल याला सिया गोयल हिने प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने ढकलून दिले. ज्याने मोठी खळबळ उडाली. सिया हिने सुरूवातीला हा अपघात झाल्याचे दाखवले. मात्र, पोलिस तपासात जे काही पुढे आले, त्याने मोठी खळबळ उडाली. सिया गोयल हिने सर्व कट अगोदरच रचला होता. आता पोलिस तपासात धक्कादायक बाब पुढे आली. ज्यावेळी सिया गोयल आणि चेतन यांनी केतनला दरीत ढकलून दिले, त्यावेळी 15 मिनिटे सिया एकाच ठिकाणी शांतपणे बसली. यादरम्यान तिने आपल्याला कोणी पाहत नाही, यासोबतच चेतन सुरक्षितपणे पळून गेल्याचा संकेत मिळाल्यानंतर हिने नाटकबाजी करण्यास सुरू केली. सर्वात अगोदर सिया गोयल हिने आपल्या आईला फोन केला. यादरम्यान तिने आईला सांगितले की, केतन दरीत कोसळला आहे.

त्यानंतर सिया हिच्या आईनेच केतन लोहगडावरून पडल्याची माहिती केतनच्या आई वडिलांना आणि इतर नातेवाईकांना दिली. केतनला खरी मदतीची गरज असताना सिया नातेवाईकांसोबत बोलत होती. त्यानंतर तिने बचाओ-बचाओ माझा होणारा नवरा पडला म्हणून तिने ओरडण्यास सुरूवात केली. ज्या खोट्या पद्धतीने सिया आक्रोश करत होती.

तिला पाहून सर्वांनाच वाटले की, सिया खरे बोलत आहे. त्यानंतर गडावर उपस्थित पर्यटकांनी पोलिस आणि बचावकार्यासोबत संपर्क साधला. ज्यावेळी केतन अग्रवाल याला खऱ्या मदतीची गरज होती, तो जखमी अवस्थेत होता, त्यावेळी सिया नाटक करत होती. तिने मुद्दयाम बचतकार्याला उशीर केला. केतनला धक्का दिल्यानंतर सिया एकाच जागी बसली.

त्यानंतर चेतन याने गडावरून पळ काढला. जोपर्यंत चेतन सुरक्षित तिथून निघत नाही. तोपर्यंत सिया शांत बसून होती. चेतन आणि सिया यांनी पूर्ण कट अगोदरच रचला होता. त्यानुसारच, सिया हिने सर्वकाही केले. पोलिस सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांची कसून चाैकशी करत आहेत. सियाच्या आई वडिलांचीही पोलिसांकडून चाैकशी करण्यात आली. या प्रकपणात धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे.

Follow Us