नगरपंचायत निवडणुकीत उतरलेल्या भाजप उमेदवारावर काळाचा घाला, प्रचारानंतर हार्ट अटॅकने निधन

| Updated on: Jan 08, 2022 | 11:00 AM

सुधीर अनंत चव्हाण हे कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर चव्हाण निवडणूक लढवत होते.

नगरपंचायत निवडणुकीत उतरलेल्या भाजप उमेदवारावर काळाचा घाला, प्रचारानंतर हार्ट अटॅकने निधन
मयत उमेदवार सुधीर चव्हाण
Follow us on

सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर सुधीर चव्हाण प्रचारात रंगले होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुर्दुग जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात

सुधीर अनंत चव्हाण हे कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर चव्हाण निवडणूक लढवत होते.

भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून तीन जानेवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांजवळ चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सध्या ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त होते.

प्रचारानंतर हृदयविकाराचा झटका

शुक्रवारी रात्री भाजप कार्यालयात प्रचारासंदर्भात माहिती देऊन ते आपल्या मित्राच्या घरी गेले. त्या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

निवडणूक जिंकली पण अध्यक्षपदी कोण ? जिल्हा बँकेचा कारभार विठ्ठल देसाईंकडे ? भाजपचे अनेक नेते रांगेत

CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण

परजातीच्या प्रियकरामुळे अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट, आईला संताप अनावर, मुलाच्या मदतीने लेकीचा जीव घेतला