
सिंधुदुर्ग | 25 सप्टेंबर 2023 : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत भाजपच्या नेत्याने महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी गंभीर आरोप केला आहे. स्वित्झर्लंडवरून येणाऱ्या व्यक्तीसाठी मृत्यूची बातमी बाहेर येऊ देऊ दिली नाही, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वित्झर्लंडमधील अकाऊंटबद्दल माहिती सामनात कधीतरी दे, असा टोला नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला. तसंच स्वित्झर्लंडमधून कोण यायचं होतं… म्हणून बाळासाहेबांच्या मृत्यूची बातमी थांबवली गेली, असा आरोपही नितेश राणेंनी केला आहे. त्यांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात हक्क भंग प्रस्ताव स्वीकारावा. अशी मी मागणी केली आहे. हे दोघे ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकता आहेत. हे तर न्यायालयावरच दबाव टाकण्यासारखा आहे. संजय राऊत यांनी विधानसभेला चोर मंडळ म्हटलं आहे. सामनात अमित शाहांवर सहकाराच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आली आहे. ज्याला सहकारातलं कळत नाही त्यांनी टीका करणं म्हणजे हास्यास्पद आहे. संस्था डुंबवने हे यांच्या रक्तात आहे. अमित शहांवर बोलण्याएवढी संजय राऊतची लायकी नाही. पवार कुटुंबियांना काड्या लावणारा हाच शकुनी मामा आहे, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नागपुरात आलेल्या पुरावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी स्वत:चं आधी बघावं. त्याच्या बुडाखाली किती आग आहे ते बघावं. देवेंद्र फडणवीस नागपूरला लगेच गेले तुझ्या मालकासारखे ताजला गेले नाहीत, असं नितेश राणे म्हणालेत.
आदित्य ठाकरेंवर आता अत्याचार सुरू आहे का? त्यांनी त्यांच्या आवाजाचा फायदा घ्यावा. रामदास कदम हे विरोधीपक्ष नेते असताना हे ठाकरे पिता पुत्र बिळात जाऊन लपलेले होते. सरकार असतानाही ते घराबाहेर पडले नाहीत. आता मात्र आमच्या सरकारवर टीका करत आहेत. जनता हे सगळं पाहात आहे, असं नितेश राणे म्हणालेत.