Ajit Pawar : मलाही बोलता येतं पण…; अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावलं

Ajit Pawar on Gopichand Padalkar : आमदार गोपीतंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा अजितदादांनी भर पत्रकार परिषदेत समाचार घेतला. विनाशकाली विपरित बुद्धी!, वाचाळवीर, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांना सुनावलं आहे. वाचा अजित पवार नेमकं काय म्हणाले...

Ajit Pawar : मलाही बोलता येतं पण...; अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावलं
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 11:49 AM

पुणे | 25 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत सुनावलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना भर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला. मलाही बोलता येतं. पण अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही. हे लोक म्हणजे वाचाळवीर आहेत. यांना मी एवढंच म्हणेन विनाशकाले विपरित बुद्धी!, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यांना आम्ही मानत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या बातम्या चालल्या आहेत. या गोष्टीला आता 14 महिने झाले आहेत. प्रत्येक यंत्रणा काम करते आहे. या बातम्यामध्ये काही अर्थ नाही. जो पर्यंत कुठला निकाल नाही. तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा विचारच नाही. मी फक्त विकासासाठी काम करतो. केवळ विकास हेच आमचं ध्येय आहे, असंही अजित पवार म्हणाले.

मुस्लिम आरक्षणासाठी अजित पवार आग्रही आहेत. तशी बैठकही त्यांनी घेतली होती. त्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अल्पसंख्याक मंत्री आणि इतर मंडळी बरोबर बैठक घेतली होती. यात वक्फ बोर्डबद्दल चर्चा झाली. मी पण सांगितलं की, महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आणि शाहू फुलांची विचारधारा यांना घेऊन मी पुढे जातोय.दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता सगळे कामं होतील. कायद्याच्या चौकटीत सगळं बसवले जाईल आणि निर्णय होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. अजित पवार यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. खूप वेळा बैठका झाल्या. खूप वेळा अनेक रिसर्च झाला आहे. धनगर समाजाला समाधान मिळेल असे आरक्षण मिळायला हवं. धनगर समाजाला एनटीमधून आरक्षण मिळायला हवं होतं. पण ते धनगड आणि धनगरवरुन अडकलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी.
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला...
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला....
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?.
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'.