
मनोज गाडेकर, शिर्डी, अहमदनगर , दि. 26 फेब्रुवारी 2024 | सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर सोमवारी शिर्डीत पोहचले. त्यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांनी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, असे स्पष्ट केले. त्यांना मराठा आरक्षणावरुन राज्यात दुफळी माजत असल्याबद्दल विचारले. तेव्हा वाडकर यांनी म्हटले की, साईबाबांनीच मोदीजींना प्रधानमंत्रीपदी बसवलंय आहे. मोदींजी आता सर्वकाही व्यवस्थित करणार आहे. सर्व देवी देवतांनी आणि बाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केलीय. ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठी केली आहे.
पूर्वीची आणि आत्ताची शिर्डी यात जमीन अस्मानचा फरक झाला आहे. मी पूर्वी लक्ष्मीवाडीपासून सायकलवर शिर्डीत येत होतो. त्यावेळी तासंतास समाधी समोर बसायचो. पण आता खूप बदल झालाय. भविकांसाठी चांगल्या सुविधा झाल्या. भाविकांना दर्शनासाठी काहीच अडचण येत नाही. नाशिकला मी नेहमी जातो. तेव्हा पाहतो की प्रत्येक दोन किलोमीटर एक मंडळ शिर्डीला पायी जाते. म्हणजे कुठेतरी मोठी शक्ती आहे.
अनेक वर्षांनंतर सुरेश वाडकर साई दर्शनाला आले. सोमवारी गायक सुरेश वाडकर साई दरबारी आले. त्यांनी सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. खूप वर्षांनी येणं झाले आहे. ते आता आईची शिर्डीला येण्याची प्रखर इच्छा होती. त्यामुळे आलो आहे. 1967 पासून मी साईबाबांच्या दरबारी येतो. साई दर्शनानंतर मला फक्त रडायला येत आहे. बाबांकडे मी काहीच मागत नाही. बाबांनी काहीही न मागता सगळं देतात.
प्रस्ताव आल्यास शिर्डी कॅरीडोर करणार असल्याचे केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी शिर्डीत म्हटले होते. त्यामुळे शिर्डीत भाविकांसाठी अधिक सुविधा होणार आहे. साईबाबा संस्थानने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र विचार करणार असल्याचे त्यांनी शिर्डी भेटी दरम्यान म्हटले होते.