केतनच्या कुटुंबियांना आम्ही सियाच्या त्या गोष्टीबद्दल कल्पना दिली होती.. सिया गोयलच्या आईचा मोठा खुलासा, थेट गुपित..

केतन अग्रवाल प्रकरणात आता सिया गोयल हिच्या आईने मोठा खुलासा केला. पहिल्यांदाच त्यांनी यावर भाष्य केले. केतन अग्रवाल प्रकपणात दररोज काही खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्येच सियाच्या आईने कॅमेऱ्यासमोर येत मोठी माहिती सांगितली.

केतनच्या कुटुंबियांना आम्ही सियाच्या त्या गोष्टीबद्दल कल्पना दिली होती.. सिया गोयलच्या आईचा मोठा खुलासा, थेट गुपित..
Ketan Agrawal case
| Updated on: Jul 01, 2026 | 12:30 PM

केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जूनला सिया गोयल ही होणारा पती केतन अग्रवाल याला घेऊन लोहगडावर गेली. तिथे तिचा प्रियकर चेतन चाैधरीही उपस्थित होता. वेळ साधून त्यांनी केतनला खोल दरीत धक्का दिला. केतन अग्रवाल याची ही हत्या सुरूवातीला अपघात दाखवण्यात आली. मात्र, जसा जसा पोलिस तपास पुढे गेला, त्यातून झोप उडवणारी माहिती पुढे आली. सिया हिच्याकडून अगोदरही केतनला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने लोहगडावरूनच त्यापूर्वीही धक्का दिला होता. मात्र, त्यावेळी एका झाडाला पकडल्याने केतन वाचला. त्यावेळी सिया हिने साप दिसल्याने धक्का दिल्याचे म्हटले होते. सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. तिचे प्रेम चेतनवर होते. मात्र, हे कुटुंबियांना सांगण्यापेक्षा केतनला मारणे तिला सोपे वाटले. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

सिया गोयल हिच्या आई वडिलांना तिच्या आणि चेतनच्या नात्याबद्दल कल्पना असल्याचाही आरोप केला जात आहे. यादरम्यान सिया गोयल हिच्या आईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना सिया गोयल हिची आई म्हणाली की, सियाच्या शिक्षणाबद्दल चर्चा सुरू आहे. सियाला शिक्षणात काही रस नव्हता. ती बारावी नापास आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण याबाबत आम्ही केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांना अगोदरच कल्पना दिली होती.

मी स्वत: सांगितले होते की, सिया बारावी नापास आहे. पण त्यांना त्याबाबत काहीच समस्या नव्हती. सियाच्या आई वडिलांनी स्पष्ट केले की, आम्हाला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. चेतन आणि सियाच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हते. जर आम्हाला याबाबत काहीही माहिती असते तर आम्ही त्यांची माफी मागत हे नाते संपवले असते.

लोहगडावरील केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीचे लोणावळा पोलिसांकडुन लोहगडावर रिक्रिएशन करण्यात आले. आरोपी सिया गोयलचे रिक्रिएशन नंतर चेतन चौधरीचेही पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात आले.  गुन्ह्याची खरी परिस्थिती आणि आरोपीने दिलेली कबुली यामध्ये तफावत आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Follow Us