AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट फुफ्फुसात अडकला शेंगदाणा, चिमुकल्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; तब्बल अडीच तास…

श्वसननलिकेत अडकलेल्या या वस्तूमुळे त्याचे उजवे फुफ्फुस पूर्णपणे निकामी झाले होते. या शस्त्रक्रियेत भूल देणे आणि श्वसनलिकेच्या अरुंद मार्गातून शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते. थोडी जरी चूक झाली असती तर बालकाचा प्राण गेला असता.

थेट फुफ्फुसात अडकला शेंगदाणा, चिमुकल्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; तब्बल अडीच तास...
smALL CHILD AND PEANUT IN LUNGSImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2026 | 3:44 PM
Share

 Nagpur News : लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं म्हटलं जातं. इवलसं लेकरू जेव्हा घरात इकडे तिकडे धावतं तेव्हा घरात सगळीकडे आनंद पसरतो. परंतु हेच लहान मुलं असं काही करून ठेवतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हैराण होतं. बाळाची तब्येत अचानक बिघडते. कित्येक दिवस रुग्णालयात उपचार करूनही त्याला बरं वाटत नाही, तेव्हा मात्र आई-वडील तसेच कुटुंबातील सदस्यांचा जीव टांगणीला लागतो. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर नंतर मात्र धक्कादायक सत्य समोर येतं. सध्या नागपुरात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका छोट्या बाळाच्या फुफ्फुसात चक्क शेंगदाणा अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलाचे एक फुफ्फुस पूर्णपणे निकामी झाले होते. डॉक्टरांनी मात्र या लेकराला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे.

नेमके काय घडले?

नागपूर खेळता खेळता तीन वर्षाच्या चिमुकल्याने खाल्लेला शेंगदाणा त्याच्या फुफ्फुसात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. अडकलेल्या शेंगदाण्याला बाहेर काढण्यासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जोखमीच्या अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी चिमुकल्याला पुनर्जन्म दिला आहे. सुरुवातीला चिमुकल्याला न्यूमोनिया झाला होता. न्यूमोनिया झाला म्हणून त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निमोनियावर उपचार करत असताना एक्स-रे आणि सिटीस्कॅन करण्यात आले तेव्हा डॉक्टरही चक्राऊन गेले. कारण हा साधारण निमोनिया नसून बालकाच्या उजव्या श्वसननलिकेत काहीतरी बाह्य वस्तू अडकल्याचे समोर आले होते.

थोडी जरी चूक झाली असती तर…

श्वसननलिकेत अडकलेल्या या वस्तूमुळे त्याचे उजवे फुफ्फुस पूर्णपणे निकामी झाले होते. या शस्त्रक्रियेत भूल देणे आणि श्वसनलिकेच्या अरुंद मार्गातून शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते. थोडी जरी चूक झाली असती तर बालकाचा प्राण गेला असता. डॉक्टरांनी फायबर ऑप्टिकब्रोंकोस्कोपीद्वारे अडकलेल्या वस्तूचा अचूक शोध घेतला. त्यानंतर रिजीड बोन्कोस्कोपी वापर करून शेंगदाण्याचे तुकडे बाहेर काढले. या ऑपरेशननंतर चिमुकल्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हस्य परतले. त्यावेळी डॉक्टरांनी तसेच पालकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, लहान मुलांची काळजी घ्यावी. मुलांपढे छोट्या वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन केले जात आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर