मोदींचे पैसे आले म्हणून शेतकरी धोतर फाटेपर्यंत..शिंदे शिवसेनेच्या नेत्याचं पीएम मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अलीकडे एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढत चालला आहे. त्यात आता भर घालणारं एक वक्तव्य एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माजी आमदाराने केलं आहे.

मोदींचे पैसे आले म्हणून शेतकरी धोतर फाटेपर्यंत..शिंदे शिवसेनेच्या नेत्याचं पीएम मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
PM Narendra Modi
| Updated on: Nov 08, 2026 | 12:34 PM

अक्कलकोटचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. थेट नरेंद्र मोदींचा बाप काढला. “मोदींचे पैसे आले म्हणून धोतर फाटेपर्यंत शेतकरी बँकेत पळतात. हे पैसे तुमचे आहेत. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत” असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. “Ai डेटा सेंटर हा गुजरातने नको म्हंटलेला प्रकल्प इकडे आणला. त्यातून आलेले 15-20 टक्के कमिशन खाऊन तेच पैसे इलेक्शन मध्ये वाटतात आणि तुम्ही पण पैसे घेऊन त्यांना मतदान करता. तुम्ही त्यांना मतदान करता आणि पाणी नाही म्हणून आमच्याकडे बोंबाबोंब करता” असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.

“हे संविधान वाचवा म्हणून मोर्चा काढतात. मात्र यांना संविधान काय माहित?. कल्याणशेट्टी यांचे सर्व निवडून आलेले अक्कलकोट तालुक्यातील उमेदवार हे डुप्लिकेट सर्टिफिकेटवर निवडून आलेले आहेत. त्यांच्याविरोधात केसेस सुरु आहेत” असा आरोप सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला.

Loading...

अरे कोण होतास तू, काय झालास तू

“उजनीचे 40 टक्के पाणी बाष्पीभवन होते. Ai डेटा सेंटर आल्यावर पाणी आणखी वाया जाणार आहे. मात्र इथले नेते म्हणतात डेटा सेंटर होणारच. 100 पवार येउदे ते डेटा सेंटर होणारच असं इथले नेते म्हणतात” असा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना टोला लगावला. “अरे कोण होतास तू, काय झालास तू. त्यांचेच लोक म्हणतात जे दोन नंबरचे पैसे एक नंबर करायचे म्हणून यांना डीसीसी बँक पाहिजे असं म्हणतात” असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.

बायकोचा भाऊ अंड्यापेक्षा मऊ

“मोदींचे पैसे आले म्हणून धोतर फाटेपर्यंत शेतकरी बँकेत पळतात. हे पैसे तुमचे आहेत. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत. पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करावे लागणार आहे. 70 वर्षात असला प्रकार नव्हता कधी. यांना पाणी सोडायचे नाही, यांना फक्त रस्ते करायचे आहेत. रस्ते करायचे कशासाठी तर यांना 15-20 टक्के पाहिजे. बायकोचा भाऊ अंड्यापेक्षा मऊ” असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us