Rajendra Bhinge: राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शन…
Rajendra Bhinge News: पंढरपूर शहर मध्ये 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्र भिंगे यांची गोळ्या झाडून संपवण्यात आले होते. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला असून याची पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले

Rajendra Bhinge Case: पंढरपूर शहर मध्ये 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्र भिंगे यांची गोळ्या झाडून संपवण्यात आले होते. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला असून याची पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे. पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांची 2017 मध्ये संपवण्यात आले होते. या प्रकरणात राजेंद्र भिंगे हा मुख्य आरोपी होता. याची नुकतीच निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भोईटे यांच्या हत्येच्या बदल्यासाठी राजेंद्र भिंगे यांचा खून करण्यात आला असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
या प्रकरणांमध्ये पुणे येथून नागे नावाचा शूटर बोलविण्यात आला होता. हा शूटर काही दिवस पंढरपूर मध्ये राहून त्याने भिंगे यांची रेकी केली होती. यातूनच जेवणानंतर भिंगे हे एकटेच शतपावली साठी बाहेर पडतात हे पाहून दुचाकी वर येऊन भिंगे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या हलेखोरांकडून पुण्यात वापरलेले पिस्टल ही जप्त केले आहे. यामध्ये एक आरोपी 24 तासाच्या पंढरपुरात पकडण्यात आला. प्रतीन आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पकडले होते. त्यांचा तपास करताना उरलेले आरोपी गुजरातमार्गे राजस्थानकडे पळून जाणार असल्याची माहिती तपासात समोर आली. यानंतर पोलिसांनी विविध पथके पाठवून गुजरातच्या सोमनाथ येथून या तीन आरोपींना अटक केली. सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून यामागे कोणी सूत्रधार आहे का? याचा तपास केला जात असल्याचे पोलिस अधीक्षकातून कुलकर्णी यांनी बोलून दाखवले आहे.
बारा तासाच्या आत पोलिसांनी एकापाठोपाठ एक आरोपी पकडण्यास सुरुवात केलेली. शेवटचे आरोपीला काल गुजरात येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात प्रथम प्रवीण उर्फ तात्या शिंदे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) यांना अटक केली होती.