पहाटेच घराबाहेर पडले… अन् घात झाला; कॉलेजच्या तीन मित्रांचा मृत्यू ; घात की अपघात ? संशय का बळावला ?

सोलापूरमध्ये पहाटेच्या अपघातात तीन कॉलेज विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांची प्राणज्योत मालवली. मृतांपैकी एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

पहाटेच घराबाहेर पडले... अन् घात झाला; कॉलेजच्या तीन मित्रांचा मृत्यू ; घात की अपघात ? संशय का बळावला ?
तीन मित्रांचा अंत
| Updated on: Feb 16, 2026 | 2:35 PM

सोलापूरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजातील तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे तिन्ही मित्र पहाटे घराबाहेर पडले होते. ते परत आलेच नाही. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. यातील एकजण गोसेवक असल्याने हा अपघात आहे की घातपात? असा संशय बळावला आहे. पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. तर या अपघातामुळे तिन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सोलापूर शहरातील रुपाभवानी माता मंदिराच्या परिसरात ही घटना घडली आहे. या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. पहाटे 4 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर जोराचा आवाज आला. त्यामुळे गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेतील या तिघांना गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तर अंधाराची वेळ असल्याने अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. त्यामुळे आरोपीला शोधण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

तर्कवितर्क काय ?

नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघेही एकाच गावचे असून एकाच कॉलेजात शिकत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या तिघांपैकी एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात की घातपात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पहाटे का बाहेर पडले ?

हे तिन्ही तरुण पहाटेच घराबाहेर पडले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तिघांनाही पहाटे बाहेर जाण्याची गरज काय होती? त्यांना कुणी बोलावलं होतं का? असे प्रश्न स्थानिकांना पडले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.