AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident : नगर-सोलापूर रोडवर 4 वाहनांचा विचित्र अपघात! दोघे ठार तर 8 ते 10 जण गंभीर जखमी

Ahmednagar Accident : या अपघातात 25 वर्षीय तरुण कृष्णा मल्हारी बोरुडे याच्यासह सोपान दिनकर जागीच ठार झाले होते.

Accident : नगर-सोलापूर रोडवर 4 वाहनांचा विचित्र अपघात! दोघे ठार तर 8 ते 10 जण गंभीर जखमी
चार वाहनांचा विचित्र अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 12:52 PM
Share

अहमदनगर : राज्यातील अपघातांची मालिका (Maharashtra Road Accident) थांबायचं नाव घेत नाहीये. अहमनगर- सोलापूर (Ahmednagar- Solapur four vehicle accident) महामार्गावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जीव (Two killed in Accident) गेला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहे. मालवाहतूक करणारा एक ट्रक, एक रीक्षा, क्रूझर जीप आणि टू व्हिलर गाडी यांच्या धडक होऊन विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीप आणि ट्रक यांच्यासह रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय. चार वाहनांच्या विचित्र अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे आि सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झालाय. तर जखमी झालेल्या इतर दहा जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. नगर-सोलापूर रोडवरच्या कोकणगावच्या शिवारात बोराडे वस्तीजवळ हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत मदतीचा हात दिलाय.

कसा झाला अपघात?

नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती इथून एक मालवाहू ट्रक जात होता. हा ट्रक सोलापूरहून नगरच्या दिशेनं निघालेलं. तर इतर वाहनं नगरहून सोलापरूच्या दिशेनं जात होती.

TN 88 X 9243 या क्रमाकांच्या मालवाहून ट्रकनं MH 09 BM 9859 या क्रमांची क्रूझर आणि MH 09 DM 4557 या क्रमांकाच्या ऍपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या रिक्षा रस्त्यावर पलटली. तर क्रूझरला दिलेल्या धडकेत गाडीचंही मोठं नुकसान झालंय. या अपघातात 25 वर्षीय तरुण कृष्णा मल्हारी बोरुडे याच्यासह सोपान दिनकर जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना तत्काल रुग्णालयात उपचारासाठी नगरला आणण्यात आलं.

अपघात सत्र थांबेना…

राज्यात गेले काही दिवस सातत्यानं अपघाताच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. राज्यातील अपघातात रस्ते बळींचीही संख्या चिंतजनक आहे. रात्रीच्या वेळीस बेदरकारपणे वाहनं चालवून किंवा वाहनांवरील नियंत्रण सुटून होत असलेल्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण जात असल्याचं अधोरेखित झालंय. त्यामुळे काळजी व्यक्त केली जाते आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.