Anant Chaturdashi 2022 : विसर्जन मिरवणुकीसाठी सोलापुरात तगडा पोलीस बंदोबस्त;संवेदनशील भागात सशस्त्र पोलीस

| Updated on: Sep 09, 2022 | 8:19 AM

सोलापूर (Solapur) शहरात विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सोलापूर शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त तब्बल 2080 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Anant Chaturdashi 2022 : विसर्जन मिरवणुकीसाठी सोलापुरात तगडा पोलीस बंदोबस्त;संवेदनशील भागात सशस्त्र पोलीस
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: t v 9
Follow us on

सोलापूर : आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यानिमित्त राज्यभरात भव्य अशा विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात. मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तगडा पोलीसबंदोबस्त (police) तैनात करण्यात येतो. सोलापूर (Solapur) शहरात देखील विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सोलापूर शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त  तब्बल 2080 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच मिरवणुक पहाण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून देखील 1 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संवेदनशील भागात सशस्त्र पोलीस बंदोबस्त

अनंत चतुर्दशनिमित्त सोलापुरात मोठा पोलीसबंदोबस्त तैनात  करण्यात आला आहे. यामध्ये 3 डीसीपी, 8 एसीपी, 118 पोलीस अधिकाऱ्यांसह 2080 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील संवेदनशील भागात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.  मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था

शहरातील ज्या भागांमधून मुख्य मिरवणुका निघणार आहेत त्या भागात सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे.

विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात

आज लाडक्या बप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. शहरातून भव्य विसर्जन मिरवणुका निघतात. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी शहरात 12 ठिकाणी कुत्रिम कुंड तर 82 ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.  विसर्जनासाठी महापालिकेने तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.