Lalbaugcha Raja : लालबाग राजाच्या मंडपातून थेट आढावा! लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन, अशी सुरु आहे विसर्जनाची तयारी

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली नव्हती. मात्र यावेळी सर्व गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यात आलेल्या. कोणतीही बंधनं नाहीत. त्यामुळे यंदा भव्य मिरवणूक काढत, वाजत गाजत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाईल.

Lalbaugcha Raja : लालबाग राजाच्या मंडपातून थेट आढावा! लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन, अशी सुरु आहे विसर्जनाची तयारी
लालबागचा राजाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:06 AM

मुंबई : आज अनंत चतुर्दशी. आज लाडक्या गणपती बाप्पाचा विसर्जन (Mumbai Ganesh Visarjan) सोहळा पार पडेल. लालबागच्या राजा (Lalbaug cha Raja) मंडपापासून विसर्जनाआधी विशेष आढावा टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींनी घेतला. गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी (Mumbai Ganesh Festival) लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. दरम्यान, सकाळपासूनच लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची विसर्जनासाठीची लगबग पाहायला मिळालीय.

पाहा व्हिडीओ : थेट लालबागचा राजा मंडपातून आढावा

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली नव्हती. मात्र यावेळी सर्व गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यात आलेल्या. कोणतीही बंधनं नाहीत. त्यामुळे यंदा भव्य मिरवणूक काढत, वाजत गाजत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाईल.

हे सुद्धा वाचा

बँन्ड, लेझिम यांच्यासोबत ढोलताशाच्या पथकाच्या हजेरी लालबागच्या राजाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली जाते. लालबाग मार्केटमधून ही मिरवणूक निघते. भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक, नागपाडा, सुतार गल्ली, माधवबाग, ऑपेरा हाऊस या मार्गे लालबागचा राजा गिरगाव चौपाटी असा प्रवास करत विसर्जनासाठी दाखल होतो.

तासनतान रांगेत उभं राहायला लागू नये, म्हणून अनेक गणेशभक्त हे लालबागच्या राजासह मुंबईच्या प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी घराबाहेर पडतात. वेगवेगळ्या ठिकाणांहून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थेवरही ताण येऊ नये, यासाठी काही बदलही वाहतूक मार्कात करण्यात आली आले.

पाहा LIVE घडामोडी : Video

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली आहे. मोठ्या उत्साहात, थाटामाटात आज गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएपच्या 8 तुकड्या पोलिस बंदबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर 3 हजार अधिकरी आणि 15 हजारांच्या वर पोलीस बंदोबस्तातानी तैना करण्यात आलेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.