विठुरायाच्या नित्य पुजेसाठी भाविकांत उत्साह; यामुळे विठुराया झाले मालामाल, पुजेचे बुकिंग या तारखेपर्यंत झाले पूर्ण

नित्यपूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना दिली जाते. हळद, कुंकू लावून देवाला पेढे आणि फळांचा महाप्रसाद दाखवला जातो.

विठुरायाच्या नित्य पुजेसाठी भाविकांत उत्साह; यामुळे विठुराया झाले मालामाल, पुजेचे बुकिंग या तारखेपर्यंत झाले पूर्ण
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 11:46 AM

सोलापूर : विठुराया हे महाराष्ट्राचे दैवत. विठ्ठल-रुख्मिणीची पूजा करायाची असेल, तर त्यासाठी बुकिंग करावे लागते. यातून मंदिर समितीला मोठी रक्कम मिळते. कोरोना काळात ही रोजची पूजा बंद होती. पण, आता या पूजेला भाविकांचा मोठा उत्साह वाढत आहे. त्यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत नित्य पूजेचे बुकिंग फुल झाले आहे. यातून मंदिर समितीला कोट्यवधी रुपये मिळाले. यामुळे विठुराया मालामाल झाले आहेत.

7 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची पहाटे होणारी एकमेव नित्यपूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात होणाऱ्या 300 नित्यपूजेचे बुकिंग फुल झाले. या नित्य पुजेतून मंदिर समितीला 7 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.

PANDHARPUR 2 N

हे सुद्धा वाचा

विठ्ठलाच्या नित्य पूजेसाठी २५ हजार

दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची नित्यपूजा केली जाते. पूजा करणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचे बुकिंग केले जाते. श्रीविठ्ठलाच्या नित्य पूजेसाठी २५ हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्य पूजेसाठी ११ हजार रुपये भरावे लागतात.

देवाला पेढे, फळांचा महाप्रसाद

ठरलेल्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा दहा ते बारा लोकांना नित्य पूजेसाठी सकाळी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्यपूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना दिली जाते. हळद, कुंकू लावून देवाला पेढे आणि फळांचा महाप्रसाद दाखवला जातो.

३०० नित्य पूजेचे बुकिंग फुल

कोरोना काळात नित्य पूजा बंदी‌ होती. पुजा सुरू करण्याचा निर्णय झाल्यापासून नित्य पूजेला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षातील जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या 300 नित्य पूजेचे बुकिंग मार्च महिन्यातच फूल झाले आहे.

राज्यातचं नव्हे तर राज्याबाहेरील भक्त पूजेसाठी बुकिंग करून ठेवतात. यातून मंदिर समितीला मोठी रक्कम मिळते. या रकमेतून मंदिर परिसराचा विकास करता येतो.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.