“हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ वाढवण्यासाठी नाव बदलले जाते”; नामांतर प्रकरणावरून माकप नेत्याने भाजपच्या वर्मावरच घाव घातला

| Updated on: Jun 01, 2023 | 8:43 PM

नव्या संसदेच्या उद्घाटनावरूनही त्यांनी मोदी सरकावर लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, नवीन इमारत बनवून उपयोग नाही तर संसदेचे कार्य मजबूत व्हायला हवे असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ वाढवण्यासाठी नाव बदलले जाते; नामांतर प्रकरणावरून माकप नेत्याने भाजपच्या वर्मावरच घाव घातला
Follow us on

सोलापूर : सध्या देशाच्या राजधानीमध्ये महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत. त्यावरून आता देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरूनच आता माकपचे महासचिव सीताराम येचूरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. दिल्लातीत महिला कुस्तीपटूंचा चाललेल्या आंदोलनावरून त्यांनी केंद्रावर टीका केली आहे. देशातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या गेलेले पैलवान त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत ते आता रस्तावर उतरत आहेत तरीही सरकार गप्प असल्याची टीका त्यांनी केली आहे.

याआधी पंतप्रधान त्यांचे कौतुक करत होते मात्र आज त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत. तसेच सुप्रीम कोर्टने आदेश देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

एकीकडे खेळाडू आंदोलन करत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान राज्याभिषेक असल्याप्रमाणे सेंगोल घेऊन संसदेत बसवत होते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. वास्तविक पाहता राजे लोकांचा राज्याभिषेक होताना सेंगोल बसवला जातो असंही त्यांनी यावेळी त्यांनी बोलून दाखवले.

सीताराम येचूरी यांनी केंद्र सरकावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, 2022 मध्ये फक्त 56 दिवस संसद भरली होती तर पूर्वी 212 दिवस संसद भरत असायची असा घणाघातही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

यावेळी त्यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, कायदे बनविण्यासाठी एक कमिटी असायची मात्र आता सगळे बदलले आहे. कारण सध्या कोणत्याही कायद्यावर चर्चा न होताच कोणतेही बील पास केले जाते असं म्हणत त्यांनी भाजप सरकारच्या कामावरही जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावरूनही त्यांनी मोदी सरकावर लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, नवीन इमारत बनवून उपयोग नाही तर संसदेचे कार्य मजबूत व्हायला हवे असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.