पंढरपुरातून 7 वेळा खासदार, गांधी कुटुंबाशी घनिष्ठ संबंध, शरद पवारांचे निकटवर्तीय संदिपान थोरात कालवश

| Updated on: Apr 01, 2023 | 12:11 AM

काँग्रेसचे माजी खासदार संदिपान थोरात यांचं आज निधन झालंय. त्यांचं सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं.

पंढरपुरातून 7 वेळा खासदार, गांधी कुटुंबाशी घनिष्ठ संबंध, शरद पवारांचे निकटवर्तीय संदिपान थोरात कालवश
Follow us on

सोलापूर : सोलापूरमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार संदिपान थोरात यांचं आज निधन झालंय. त्यांचं सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. संदिपान थोरात हे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून 7 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे सोल्हापुरात काँग्रेस पक्षाची वैयक्तिक हानी झालीय.

माजी खासदार संदिपान थोरात हे 1977 ते 1999 या कालावधीत सलग 7 वेळा लोकसभेवर निवडून गेले. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ म्हणून थोरात प्रचलित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या पश्चात 4 विवाहित मुले आणि 3 विवाहित कन्या तसेच पत्नी सखुबाई संदिपान थोरात असा परिवार आहे.

संदिपान थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. सुशील कुमार शिंदे यांनी संदिपान थोरात यांनी रुग्णालय प्रशासनाकडे संदिपान यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

संदिपान थोरात हे मूळते माढा तालुक्याचे. माढा येथील निमगाव हे त्याचं गाव. ते प्रतिष्ठित वकीलही होते. ते तरुणपणीच राजकारण सक्रीय झाले होते. संदिपान थोरात हे 1977 साली पहिल्यांदा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. विशेष म्हणजे तो काळ हा आणीबाणीचा नंतरचा काळ होता. त्या काळात काँग्रेस पक्ष संकटात होता. पण तरीही थोरात निवडून आले होते. ही थोरात यांची किमया होती. थोरात यांची ही किमया पुढच्या 35 वर्षांपर्यंत चालली होती.