Pune Crime| इंदापूर पोलिसांची कामगिरी ! 20 लाखांच्याअवैद्य गुटख्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Mar 18, 2022 | 6:29 PM

पोलिसांनी तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटख्यासह एकूण 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालू वर्षातील इंदापूर पोलिसांची ही चौथी मोठी कारवाई आहे. इंदापूर पोलिसांच्या सततच्या कारवाईने अवैधरित्या वाहतूक करणारांचे धाबे दणाणले आहेत.

Pune Crime| इंदापूर पोलिसांची कामगिरी ! 20 लाखांच्याअवैद्य गुटख्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
Image Credit source: tv 9
Follow us on

पुणे – इंदापूर पोलिसांनी (Indapur police) अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway)नाकाबंदी ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर हैद्राबाद वरून मुंबईकडे निघालेल्या आयशर टेंपो (एके 01 एएल 9121) अडवून तपासणी केली.  यामध्ये आर. के. कंपनीचा गुटखा मिळून आला. इंदापूर पोलिसांनी या वाहनाला ताब्यात घेतले आहे. अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक होता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचनाही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटख्यासह ( illegal gutkha)एकूण 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालू वर्षातील इंदापूर पोलिसांची ही चौथी मोठी कारवाई आहे. इंदापूर पोलिसांच्या सततच्या कारवाईने अवैधरित्या वाहतूक करणारांचे धाबे दणाणले आहेत.

कठोर कारवाई करण्याची मागणी

मात्र पोलिसांच्या कारवाईला न जुमानता अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहेत. याबरोबरच इंदापूर शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे आढळून येते आहे. पोलिसांनी यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. यापूर्वी इंदापूर पोलिसांनी छापेमारी करत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली होती,. त्यावेळी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.

Pune | जातेगाव बुद्रुकमध्ये दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादावरून तुफान हाणामारी

Dilip Tadas | शिक्षक भारतीचे प्रा. दिलीप तडस यांचे निधन, विदर्भातील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी

Kalyan Crime : कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद