
सोलापूरः महिनाभरापूर्वीच सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) प्रशसनाने एमसीएक्यू पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या एमसीक्यू पद्धतीच्या (MCQ system) परीक्षेत जाचक अटी लादल्याने प्रहार संघटनेतर्फे (Prahar Sanghtana) आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यानी आक्रमक होत पुन्हा एकदा विद्यार्थी आणि प्रहार संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे बंद केलेले गेट उघडून कुलगुरुंच्या दालनाकडे धाव घेतली होती. त्यानंतर त्यांना अडवण्यातही आले. मात्र विद्यापीठातर्फे एमसीक्यू पध्दतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत जाचक अटी लादल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. इतर विद्यापीठातून वेगळा नियम आणि सोलापूर विद्यापीठ परीक्षेबाबत विद्यार्थ्यांवर जाचक अटी का लादत आहे असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लादलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
1.या परीक्षा या ए बी सी डी या कोड पद्धतीने घेण्यात येत आहे
2. परीक्षेसाठी फक्त 60 मिनिटांचा वेळ दिलेला आहे
3. विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिला गेला नाही,
4.वर्गामध्ये बाहेरील चार चार सुपरवायझर नेमण्यात आलेले आहेत.
5.परीक्षेच्या निकालानंतर रिचेकिंग, रिव्हयाल्युशन करून मिळणार नाही त्याची फोटो कॉपी मिळणार नाही
6.उत्तर पत्रिकेसोबत प्रश्न पत्रिका काढून घेतली जाणार आहे.
1. एबीसीडी कोडची जाचक अटीची परीक्षा पद्धत त्वरित रद्द होऊन सर्वसाधारण पद्धतीने परीक्षा घ्यावी
2. विद्यापीठाकडून इतर विद्यापीठाप्रमाणे 50 पैकी 40 प्रश्न सोडवण्याची मुभा असवी.
3. विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी ज्या त्या शाखेतील अभ्यासक्रमातील प्रश्न पत्रिका काढण्यात यावी व त्यासाठी विद्यार्थ्यांना तात्काळ 100 ते 150 प्रश्नांचा प्रश्नसंच देण्याची व्यवस्था करावी
4.परीक्षेचा कालावधी 90 मिनिटाचा असावा जेणे करुन विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेमधील विद्यार्थ्याविषयाची माहिती भरता यावी व दिलेल्या प्रश्नसंचामधील प्रश्न वाचून उत्तर पत्रिकेमधील गोल भरण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल किंवा
5.सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्रावर कोरानाच्या धरतीवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावे.
त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या जाचक अटी असून विद्यार्थ्यांसाठी त्या मारक असल्याचे सागंण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडत त्याविरोधात आवाज उठविला आहे. हे आंदोलन करत विद्यार्थ्यानी आपल्या मागण्या केल्या आहेत