AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरातील पेनूर अपघातातील मृतांचा आकडा 6 वर; दोन कारची समोरासमोर झाली होती धडक

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे हा अपघात झाला असून र्पिओ आणि कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूरातील पेनूर अपघातातील मृतांचा आकडा 6 वर; दोन कारची समोरासमोर झाली होती धडक
सोलापूरातील पेनूरमध्ये कार अपघातात तीन ठारImage Credit source: tv9marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 22, 2022 | 7:01 PM
Share

सोलापूरः सोलापूरमध्ये भीषण अपघातात (Solapur Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू (Three Death)  झाला होता. मात्र आता या अपघातातील मृतांचा आकडा सहाच्या वर पोहचल्याची माहिती देण्यात आली. मोहोळ तालुक्यातील पेनूर (Penur Mohol Solapur) येथे हा अपघात झाला असून स्कॉर्पिओ आणि कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये मृत्यूमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. तर जखमींना मोहोळमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात मोहोळमधील खान कुटुंबीयांमधील सदस्यांचा समावेश असल्याचेही बोलले जात आहे.

सध्या पंढरपूर-मोहोळ रस्त्याचे काम सुरु असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

सध्या पंढरपूर-मोहोळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ आणि लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानीक रहिवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.

रस्ताच्या कामामुळे अपघात

या अपघातामुळे काही काळ या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंत बघ्यांचा गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनस्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

जखमींना मोहोळच्या रुग्णालयात दाखल

या अपघातात जखमी झालेल्यांना मोहोळच्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. समोरासमोर जोरदार धडक बसल्याने या अपघातात दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये जागीच ठार झाली आहे. तर जखमींनी मोहोळमधील जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले गेले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत