VIDEO | Solapur Accident | सोलापुरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटला, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

सोलापूर-अक्कलकोट (Solapur Accident) रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

VIDEO | Solapur Accident | सोलापुरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटला, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Solapur Accident
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 1:59 PM

सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट (Solapur Accident) रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सोलापूर-अक्कलकोट ही घटना घडली. भरघाव जाणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील नवीन घरकुल येथे ही घटना आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खाजगी वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली आहे.

पाहा व्हिडीओ 

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरामध्ये घडलेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राम बाळासाहेब बागल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत राम बागल आणि किशोर बागल हे चुलत भाऊ आहेत. दोघेजण बुलेट दुचाकीवरुन जात होते. किशोर बुलेट चालवत होता. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत बुलेट विरुद्ध दिशेने नेली. रस्त्यात विरुद्ध दिशेला आरोपी सुरज आणि सुमित यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यांनी कारचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता बुलेटची दरवाजाला धडक बसली. त्यामुळे बुलेटवर मागच्या सीटवर बसलेला राम रस्त्यावर पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने राम याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झालीये.

संबंधित बातम्या :

VIDEO | चुलत भावाची चूक जीवावर बेतली, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Jodhpur Car Accident | भरधाव कारने आठ जणांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा अपघात