‘जो हिंदू हित की बात करेंगा…’, सोलापुरात काँग्रेस आणि भाजप उमेदवार आमनेसामने

सोलापुरात गुढीपाडवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने आले. भाजप उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

'जो हिंदू हित की बात करेंगा...', सोलापुरात काँग्रेस आणि भाजप उमेदवार आमनेसामने
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 7:26 PM

राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसाचं महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येतं. मराठी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक मोठ्या शहरांमध्ये स्वागत यात्रा, शोभा यात्रा काढली जाते. ढोल-ताशा, फटाक्यांच्या आतिषबाजी यामुळे शोभा यात्रेत उत्साह संचारलेला बघायला मिळतो. यावर्षाच्या गुढीपाडव्याला जास्त महत्त्व आहे. कारण देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 19 एप्रिलला लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या गुढीपाडव्यात राजकीय नेत्यांकडून शक्तीप्रदर्शनही करण्यात आल्याचं काही ठिकाणी बघायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सोलापुरात तर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे लोकसभेचे उमेदवार एकमेकांच्यासमोर उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

सोलापुरातील बाळीवेस परिसरामध्ये हिंदू नववर्षानिमित्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते सहभागी झाले. तसेच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या देखील या रॅलीत सहभागी झाल्या. त्यामुळे एकाच रॅलीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते आमने-सामने आले. यावेळी राम सातपुते यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राम सातपुते यांच्या समर्थकांनीदेखील जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रणिती शिंदे या त्यांच्या समोरच उभ्या होत्या. पण त्यांनी कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी केली नाही. त्या शांत राहिल्या. याउलट त्यांनी घोषणाबाजी करणारे भाजप उमेदवार राम सातपुते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करुन प्रत्युत्तर दिलं.

राम सातपुते यांच्याकडून जो हिंदू हित की बात करेगा, वहीं देश पे राज करेगा अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर प्रणिती शिंदे समर्थकांकडून जय श्रीरामचा नारा देण्यात आला. सोलापुरातील बाळीवेस परिसरामध्ये हिंदू नववर्षानिमित्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये श्री रामचंद्रांची मूर्ती देखील उभारण्यात आली होती. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. राम सातपुते यांच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी केली.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.