Solapur Crime : लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केला आजीचा खून! लाकडाने मारहाण करत हत्या

| Updated on: May 17, 2022 | 12:02 PM

या महिलेच्या नातवाचं नाव सलीम नदाफ असं आहे. त्याचं लग्न लावून देण्यासाठी सोलापुरात मुलगी पाहायला आजीनं बोलावून घेतलं होतं.

Solapur Crime : लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केला आजीचा खून! लाकडाने मारहाण करत हत्या
सोलापुरात हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सोलापूर : माझं लवकर लग्न का लावून देत नाही, असं म्हणत नातवाने आजीची हत्या केली. ही खळबळजनक घटना सोलापुरात (Solapur Crime News) घडली आहे. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस (Solapur Police) ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घडना घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Solapur Murder) गुन्हा नोंदवून घेतलाय. सोलापुरातल्या आदर्श नगर, मित्र गर शेळगी इथ राहत्या घरात हे हत्याकांड घडल्यानंतर सगळेच हादरुन गेले. याप्रकरणी नातवाला पोलिसांनी अटकही केली. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस अटक करण्यात आलेल्या नातवाची कसून चौकशी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आजीनं नातवाला लग्नासाठी मुली पाहायला बोलावलं होतं. लग्नसाठी काही मुली पाहण्याचे कार्यक्रमही झाले. मात्र लग्न जुळत नसल्यानं नातवाला असह्य झाले. प्रचंड तणावात असलेल्या नातवानं अखेर अंगणात बसलेल्या आजीवर हल्ला करत तिचा खून केलाय.

कर्नाटकातून सोलापुरात बोलावलं होतं

सोलापरूच्या आदर्शन नगर, मित्र नगर शेळगी इथ मालनबी हसनसाहब नदाफ या वृद्ध महिलेनं आपल्या नातवाला लग्नासाठी घरी बोलवलं होतं. या महिलेच्या नातवाचं नाव सलीम नदाफ असं आहे. त्याचं लग्न लावून देण्यासाठी सोलापुरात मुलगी पाहायला आजीनं बोलावून घेतलं होतं.

हे सुद्धा वाचा

लग्न जुळत नसल्यानं वाद

सलीम घरी कर्नाटकातून सोलापुरात मुलगी पाहण्यासाठी आला होता. सोलापुरात त्यांनी काठी ठिकाणी लग्नासाठी मुली पाहिल्या. मात्र लग्न जुळत नसल्यानं तो तणावात होता. दरम्यान, आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या होत्या. त्यावेळी सलीम नदाफ घरी आला आणि आजीला विचारणा करु लागला. आजी तू माझं लग्न का लावून देत नाही? उगा मला कर्नाटकातून इथं का बोलवून घेतेस? अता जाब तो विचारु लागलं.

डोक्यात वार, उपचारादरम्यान मृत्यू

दोघांचं बोलणं झाल्यानंतर सलीन नदाफने आजीच्या डोक्यात काठीनं प्रहार केला. यामध्य मालनबी या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरदम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरमी फिरोज शकुर नगाफ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी सलीमविरोधात गुन्हा नोंदवून घेत त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.