NCP : अजित पवार गटाच्या तरुण पदाधिकाऱ्याच टोकाच पाऊल, सगळ्यांनाच मोठा धक्का

NCP : अजित पवार गटाच्या तरुण पदाधिकाऱ्याने टोकाच पाऊल उचललं आहे. ओंकार हजारे यांचं 2019 मध्ये लग्न झालं होतं. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. तरुणांमध्ये ते अण्णा म्हणून लोकप्रिय होते.

NCP :  अजित पवार गटाच्या तरुण पदाधिकाऱ्याच टोकाच पाऊल, सगळ्यांनाच मोठा धक्का
omkar hazare
| Updated on: Jun 11, 2025 | 8:24 AM

एक धक्कादायक बातमी आहे. सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने आपलं जीवन संपवलं. ओंकार हजारे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अजित पवार गटाच्या सरचिटणीस पदावर होता. अज्ञात कारणावरून ओंकार हजारे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी रात्री ओंकार हा आपल्या गाडीत बेशुद्धा अवस्थेत आढळून आला. कुटुंबियांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. बेशुद्धावस्थेतच ओंकारला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ओंकार याने हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेल नाही. दरम्यान ओंकार यांच्या मृत्यू संदर्भात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. पुढील तपास फौजदार चावडी पोलिस स्टेशन अधिकारी करत आहेत. ओंकार हजारे यांचं 2019 मध्ये लग्न झालं होतं. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून ओंकार हे कौटुंबिक कारणांमुळे निराशाच्या गर्तेत होते, अशी माहिती आहे. त्यांच्या मेव्हण्याचे रविवारी लग्न होते. मात्र, त्या लग्नाचे निमंत्रणही ओंकार हजारे यांना देण्यात आलेलं नव्हतं, असे त्यांच्या एका निकटवर्तीयांनी सांगितलं.

गाडीत ते सीटवर बसून होते

रविवारी सकाळी कोणाला काही न सांगता ओंकार घरातून बाहेर पडला. बराचवेळ घरी न परतल्याने ओंकारची शोधाशोध सुरु झाली. अखेर सुपरमार्केट जवळ उभ्या असलेल्या एका गाडीत ते सीटवर बसल्याच दिसून आलं. आवाज देऊनही ते काहीच प्रतिसाद देत नव्हते. अखेर गाडीचा दरवाजा तोडला. त्यावेळी ओंकार हजारेचा मृत्यू झाल्याच आढळून आलं.

अण्णा म्हणून लोकप्रिय

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ओंकार हजारे यांनी सोलापुरात पक्षासाठी संघटनात्मक बांधणीच काम केलं होतं. तरुणांमध्ये ते अण्णा म्हणून लोकप्रिय होते. ओंकार हजारेच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला असून सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत.