Rohit Pawar : रोहित पवार यांचीअजून एका आंदोलनात उडी, थेट पोहचले उजनी धरण परिसरात, आरोप काय?
Rohit Pawar on AI Data Centre: राज्यातील विविध मुद्दे हाताशी धरून त्यावर आंदोलन करण्याची हतोटी आमदार रोहित पवार यांना आली आहे. आता त्यांनी अजून एक मोठा मुद्दा हाताशी घेतला आहे. उजनी धरण वाचवण्यासाठी त्यांनी लढा सुरू केला आहे.

Rohit Pawar on AI Data Centre: राज्यातील विविध आंदोलनात उडी घेणारे आणि मुद्दा तडीस नेणारे अशी नवीन ओळख आमदार रोहित पवार यांची झाली आहे. MPSC विद्यार्थी आंदोलन, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन वा इतर आंदोलनात त्यांनी हिरारीने भूमिका मांडली आहे. आता रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण बचावचा नारा दिला आहे. त्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
उजनीवरील AI डेटा सेंटरविरोधात भूमिका
सोलापूरच्या उजनी धरणावरील AI डेटा सेंटरसह एकूण 4 प्रकल्पावरून राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उजनी धरणावरील AI डेटा सेंटरसह चार प्रकल्पाविरोधात आज रास्तारोको आंदोलन सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार रास्ता रोको आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी SP गटाचे आमदार रोहित पवार हे आंदोलनात सहभागी असणार आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने?
तर दुसरीकडे भाजपकडून उजनीवरील 4 प्रकल्पाच्या समर्थनार्थ आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. उजनी धरणावर 1 लाख 65 हजार कोटींचे एकूण 4 प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एआय डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर पॅनल, लघु अणुऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मात्र त्याला विरोध करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात आज माढा तालुक्यातील रांझणी येथे सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे. त्यामुळे आता या उजनी धरणावरील प्रकल्पावरून भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने सामने येण्याची शक्यता आहे.
न्युक्लर प्लान्ट आणि डेटा सेंटर याला आमचा विरोध
जिल्हाधिकारी यांनी समोर यांव आणि सांगवे, शासन आणि मुख्यमंत्री हे खोटे बोलत आहे. मी मुख्यमंत्री बोलते तर त्याला मी उत्तर देऊ शकतो, असा व्यक्ती येतो आणि आणि त्याला पाचवीला प्रवक्ता उत्तर देईल. डेटा सेंटरला किती पाणी लागते आम्ही मांडले आहे. न्युक्लर प्लान्ट आणि डेटा सेंटर याला आमचा विरोध आहे, असे रोहित पवार म्हणाले. भाजपला काय करायचं ते करू द्या, आमची बांधिलकी ही शेतकऱ्यासोबत आहे. कमी पाणी लागत असते तर हा प्रकल्प उजनीमध्ये का आणला, असा सवाल त्यांनी केला. आमचा विकासाला विरोध नाही, मात्र प्रोजक्टमधून फक्त 400 मुलांना नोकरी मिळणार आहे असे रोहित पवार म्हणाले.
हा उजनी नष्ट करण्याचा डाव
या प्रकल्पाविषयी काल बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. उजनी धरण यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहीलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच वाक्य वाचून दाखत आहेत. जस भीमा शंकर नष्ट करण्याचा प्रयाण केला जात आहे, तसा उजनी नष्ट करायचा डाव आहे का असा सवाल त्यांनी विचारला. सीड प्रकल्प दाखवला आहे. हा असा त्यांनी दाखवला आहे. एमओयुमध्ये सोलर प्रकल्प आहे. AI, डेटा सेंटर आहे , न्यूक्लेसर प्लांट चा MOU आहे. जागा उजनी आहे. त्या खाली सह्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
अमेरिकेत विरोध म्हणून आपल्या देशात डेटा सेंटर
अमेरिकेमध्ये डेटा सेंटरला विरोध झाला आहे. तो तिकडे विरोध आहे म्हणून देशात पाठवला जातो. देशात कुठे तर आपल्या राज्यात पाठवला जातो. डेटा सेंटर मुळे अमेरिकेत नद्या कोरड्या पडल्या आहेत. आता उजनी च्या ठिकाणी डेटा सेंटर येत आहे. तिथे पुढच्या २० वर्षात दुष्काळ पडणार आहे. प्यायला पाणी भेटणार नाही.हे मी सांगत नाहीत अमेरिकेत घडलं आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.