तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, तब्बल 400 गाड्यांचा ताफा, महाराष्ट्रात गुलाबी वादळ धडकणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह 26 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या दरम्यान पंढरपुरातील एक बडा नेता त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे.

तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, तब्बल 400 गाड्यांचा ताफा, महाराष्ट्रात गुलाबी वादळ धडकणार
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 11:37 PM

सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे 26 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्ष या दिवशी महाराष्ट्रात मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. के. चंद्रशेखर राव 26 जूनला तब्बल 400 गाड्यांच्या ताफ्यासह हैदराबादहून महाराष्ट्रात दाखल होतील. ते 27 जूनला पंढरपूरला विठुरायांचं दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथे भालके यांचा बीआरएसमध्ये पक्षप्रवेश होईल.

देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकादेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणुका एका पाठोपाठ येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर अशीच आहे. राज्यात वर्षभरापूर्वी मोठा राजकीय भूकंप घडून आला आहे.

कधी काळी एकमेकांचे पारंपरिक मित्र म्हणून ख्याती असलेले पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. तर वर्षानुवर्षे एकमेकांचे राजकीय शत्रू असलेल्या पक्षांची मैत्री झाली आहे. यामध्ये शिवसेना सारख्या मोठ्या पक्षात फूट पडलीय. या घटनांदरम्यान ’50 खोके एकदम ओके’ सारख्या घोषणाबाजीमुळे नागरिकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहून के सी आर यांची तयारी

विशेष म्हणजे बंड पुकारल्यानंतर आमदार गुवाहाटीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबतात. त्यांचा अनुभव ते स्वत: काय झाडी, काय डोंगर, ओकेमध्ये आहे, असं सांगतात. राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघतं. त्यामुळे नागरीकांची मनस्थिती देखील राजकारणापासून लांब जाताना दिसत आहे. या सगळ्या घटनांचा के चंद्रशेखर राव यांना फायदा होऊ शकतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्नासह अनेक प्रश्नांना वाचा फोडत के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची बांधणी करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर पक्षांना देखील त्याची धास्ती बसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नुकतंच पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बीआरएसला कमी समजू नका, असं म्हणाले आहेत.

के. चंद्रशेखर राव पंढरपुरात विठुरायांच्या दर्शनासाठी येणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पक्षांच्या नेत्यांचे डोळे विस्फारले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात यावं, राजकारणासाठी येऊ नये, असा सल्ला महाराष्ट्रातील राजकारण्यांनी त्यांना दिला आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.