पंढरपूरच्या विठुरायाची वाढू लागली श्रीमंती; देणगीत अशी झाली वाढ

| Updated on: Feb 18, 2023 | 11:52 AM

वाढत्या सोनं चांदीच्या वस्तु व रोख देणग्यामुळे देवाचा खजिना समृध्द होवू लागला आहे. कोरोनानंतर आर्थिक चक्र वेगाने फिरू लागले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे.

पंढरपूरच्या विठुरायाची वाढू लागली श्रीमंती; देणगीत अशी झाली वाढ
Follow us on

सोलापूर : गरिबांचा बालाजी म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कोरोनानंतर विठुरायाच्या देणगीत दुप्पटीने वाढ झाली. गेल्या वर्षी विठुरायाच्या खजिन्यात 20 कोटींचे दान जमा झाले होते. यंदा 41 कोटींचे भरभरून दान जमा झाले आहे. यामध्ये दोन वर्षांत तब्बल सात किलो वजनाचे सोन्याचे तर 76 किलो चांदीचे दागिन्याची भर पडली. अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यानी दिली. वाढत्या सोनं चांदीच्या वस्तु व रोख देणग्यामुळे देवाचा खजिना समृध्द होवू लागला आहे. कोरोनानंतर आर्थिक चक्र वेगाने फिरू लागले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे.

देणग्यांमध्ये वाढ

विविध देवस्थांनाच्या देणग्यांमध्ये वाढ होवू लागली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ही विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. आजपर्यंतचे उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडून तब्बल 41 कोटींचे उत्पन्न 31 जानेवारी अखेरपर्यंत मंदिराला मिळाले आहे.

६० कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट

मंदिर प्रशासनाने नुकताच अर्थपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये उत्पन्न वाढीचे अनेक पर्याय सुचवण्यात आले. पुढील वर्षी ६० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दानाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. भाविकांची श्रद्धा पंढरपूरच्या विठुरायावर वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एका भाविकाने पावणेदोन कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीचे दान केले.

यंदा माघीसाठी सुमारे पाच लाख भाविकांनी पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले. भाविकांची संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ झाली. यात्रा काळात सुमारे ८ लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळं उत्पन्नात भर पडली आहे. आता उत्पन्न वाढीसाठी पुढील लक्ष ठेवण्यात आले आहे.

असे वाढले उत्पन्न

गेल्या वर्षी विठुरायाला २० कोटींचे दान मिळाले होते. यंदा हा आकडा ४० कोटी रुपयांवर गेला. त्यामुळे पुढच्या वर्षीचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. ६० कोटी रुपये उत्पन्न कसं मिळेल, यासाठी मंदिर समिती प्रयत्न करणार आहे. उत्पनाचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. त्यामुळं विठुपारायची श्रीमंती वाढत आहे.