Sugar Factory : माढ्यातील श्रीसंत साखर कारखान्याची बिनविरोध निवड, अध्यक्षपदी धनाजीराव साठे, तर उपाध्यक्षपदी सुधीर पाटील

| Updated on: Jul 13, 2022 | 1:28 PM

काँग्रेसचे माजी आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष धनाजीराव साठे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याचे ऊस बील देण्यासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवली होती. यामुळे हा सहकारी कारखाना राज्यात चर्चेत आला होता.

Sugar Factory : माढ्यातील श्रीसंत साखर कारखान्याची बिनविरोध निवड, अध्यक्षपदी धनाजीराव साठे, तर उपाध्यक्षपदी सुधीर पाटील
अध्यक्षपदी धनाजीराव साठे, तर उपाध्यक्षपदी सुधीर पाटील
Follow us on

सोलापूर : माढा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा पडसाळी येथील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे माजी आमदार (Former MLA) धनाजीराव साठे (Dhanajirao Sathe) यांची तर उपाध्यक्षपदी सुधीर पाटील (Sudhir Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2005 साली कारखान्याची पहिली निवडणूक झाली. सलग चार टर्मपासून या कारखान्याने निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम राखली आहे. ऊस बील देण्यासाठी चेअरमनने स्वतःची मालमत्ता गहाण ठेवली होती. काँग्रेसचे माजी आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष धनाजीराव साठे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याचे ऊस बील देण्यासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवली होती. यामुळे हा सहकारी कारखाना राज्यात चर्चेत आला होता. कारखान्याचा सन्मानदेखील झाला होता. निवड बिनविरोध होताच साठे समर्थकांनी माढ्यात फटाके फोडून जल्लोष केला. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या खंबीर सहकार्यामुळेच कारखाना उभा राहिल्याचे चेअरमन धनाजीराव साठे यांनी बोलताना सांगितले.

विशेष सभेत निवड

कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण, सहाय्यक निबंधक सुधाकर लेंडवे, नायब तहसीलदार रविकीरण कदम यांच्यासह कारखाना संचालक मंडळ उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांत विश्वास निर्माण केला

2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली. 17 पैकी 17 जागा बिनविरोध निवडून आल्या. धनाजीराव साठे यांचे नाव विठ्ठल शिंदे यांनी सूचविले. अध्यक्षपदासाठी एकच नामनिदेशनपत्र दाखल झाले. त्यामुळं बिनविरोध निवडणूक झाली. धनाजीराव साठे यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून सहा-सात वर्षे कारखाना चालविला. सभासद, कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक कर्मचारी यांच्यात विश्वास निर्माण केला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 31 मार्च 2021 पूर्वी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश काढला होता. श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडुकीची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात आली.

हे सुद्धा वाचा