“तुम्हाला मतदान करूनही गावाचा विकास नाही”; शिवसेनेच्या आमदारासमोर असुविधांचा पाढा

| Updated on: Feb 22, 2023 | 11:09 PM

मतदारांनी गावातील समस्यांचा पाढा शहाजी बापू पाटील यांच्यासमोर वाचल्यामुळे या गोष्टीचीही प्रचंड चर्चा सुरू आहे. आता तरी शहाजी बापू पाटील यांनी मतदार संघात विकास करावा अशी मागणी आता मतदारांनी केल्या आहेत.

तुम्हाला मतदान करूनही गावाचा विकास नाही; शिवसेनेच्या आमदारासमोर असुविधांचा पाढा
Follow us on

सोलापूरः काय झाडी, काय डोंगर आणि काय हाटील या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संवादामुळे आमदार शहाजी पाटील यांना राज्यभर वेगळी ओळख करून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी केलेल्या शहाजा बापू पाटील आता वेगळ्याच एका कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. आमदार शहाजी बापू पाटील मतदार संघात गेल्यानंतर आज नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज आपल्या मतदार संघात दौरा काढला होता. त्यावेळी त्यांनी मतदारांबरोबर संवाद साधला.

त्यावेळी शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघातील मतदारांनी मतदान करूनही मतदार संघामध्ये विकासाच्या गोष्टी झाल्या नाहीत अशा तक्रारीचा पाढा वाचला आहे.

त्यामुळे नागरिकांनी आपल्या मतदार संघात चांगले रस्ते, गावामध्ये सभामंडप आणि इतर गोष्टींचा कोणताही विकास झाला नसल्याचेही मतदारांनी सांगितले.

आमदार शहाजी बापू पाटील यांना आम्ही मतदान करूनही मतदारसंघातील गावांमधून सभामंडप, चांगला रस्ता आणि इतर विकासात्मक गोष्टींची कमतरता भासत आहे. त्यामुळे शहाजी बापू यांनी मतदार संघात तरी विकासाच्या गोष्टी आणाव्या अशी मागणी मतदारांनी केली आहे.

मतदारांनी गावातील समस्यांचा पाढा शहाजी बापू पाटील यांच्यासमोर वाचल्यामुळे या गोष्टीचीही प्रचंड चर्चा सुरू आहे. आता तरी शहाजी बापू पाटील यांनी मतदार संघात विकास करावा अशी मागणी आता मतदारांनी केल्या आहेत.

गावात चांगला रस्ता नाही, सभा मंडप नाही आणि गावामध्ये प्रचंड असुविधा आहेत. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

शहाजी बापू पाटील यांना मतदान करून गावामध्ये कोणत्याच विकासाच्या गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील गावामधून विकास झालेला दिसून येत नाही. विकासाच्या मुद्यावरूनच आता नागरिकांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.