Eknath Shinde Shivsena : लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील, ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचं सूचक वक्तव्य

Eknath Shinde Shivsena : "मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते हे समोर येईल.लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील" एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील, ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचं सूचक वक्तव्य
Eknath Shinde
| Updated on: Aug 12, 2026 | 2:09 PM

दोन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर केलं. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे गटाकडून सातत्याने दावा केला जात होता. आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्या संदर्भात एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. संजय शिरसाट आज वरळी वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी केल्यानंतर मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे स्टेटमेंट केलं. “मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते हे समोर येईल.लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील” असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यातून वेगवेगळे अर्थ निघतात. आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य ठाकरेंचे आमदार, नगरसेवक आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

संजय शिरसाट यांनी आज वरळी वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर संताप व्यक्त केला. संजय शिरसाट यांनी तिथे त्यांना जो अनुभव आला तो सांगितला. ‘ही साफसफाई आम्ही येणार होतो म्हणून झाली’ हे संजय शिरसाट यांनी स्वत: सांगितलं. “कच्ची फळं देतात, जेवण वेळेवर मिळत नाही” या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. “कंत्राटदारांना सांगितलं आहे जमत असेल तर करा. खर्च करूनही चांगले जेवण मिळत नसेल तर कसं चालणार?” विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यावर आम्ही आलोय. सचिवांनाही घेवून आलोय. पैसे देवून बदनाम होतोय. विद्यार्थ्यांवर आम्ही उपकार करत नाही तर आमची बांधिलकी आहे. प्रधान सचिवांना कारवाई करायला सांगितलं आहे” अशा शब्दात संजय शिरसाट यांनी आपला संताप व्यक्त केला.

घुसलेले कोण याचा शोध घेऊ

“उपकंत्राटदाराला नफा कमी मिळतो म्हणून दर्जा खालावतो. यातून मार्ग काढला जाईल. अनधिकृतरित्या काहीजण राहतात. काहीजण नोकरीही करतात. नेमके विद्यार्थी कोण व घुसलेले कोण याचा शोध घेवून फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सांगितलं आहे” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग बंद होतायत यावर ते म्हणाले की, “आमच्याकडे ही माहिती नाही. संभाजीनगरात मोठे प्रकल्प आलेले आहेत, संख्या वाढतेय उलट”. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंनी सीएम यांची भेट घेतली हे पहिल्यांदा घडलंय का? प्रश्न संवादाने सुटतात, म्हणून ते भेटले असतील”

लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील

रायगड पालकमंत्री पदाबाबत शिरसाट यांनी महत्वाची माहिती दिली. “हा तिढा आठवड्याभरात सुटेल. आज महत्वाची बैठक आहे. पालकमंत्रीच झेंडा फडकवतील” असं विधान संजय शिरसाट यांनी केलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, “मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते हे समोर येईल.लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील” “संजय शिरसाट थायलंडला घेवून जाणारा म्हणून एक महिला पैसे घेत होती . तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्या नावावर पैसे मागत असतील, तर पोलिसात गुन्हा दाखल करा. अशा अफवांवर पसरवू नका” असं संजय शिरसाट बोलले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us