AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्नात भेसळ दिसताच थेट मोक्का, एकनाथ शिंदेंचा थेट आदेश; या चुका झाल्यास सुटका नाही

Milk Adulteration Racket : अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणात येत आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अन्नात भेसळ दिसताच थेट मोक्का, एकनाथ शिंदेंचा थेट आदेश; या चुका झाल्यास सुटका नाही
Eknath Shinde FDA moccaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 11, 2026 | 8:07 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणात येत आहे. तुकाराम मुंढे यांची FDA च्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यापासून आस्थापनांवर कारवाई कडक कारवाई केली जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी FDA च्या अधिकाऱ्यांना भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई

समोर आलेल्या माहितीनुसार, दूध पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी FDA च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करा असं एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान दिल्या आहेत. त्यामुळे आता भेसळ करणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

काही काळापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त दुधाचे रॅकेट पकडण्यात आले होते. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दुधाचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच अनेकांना अटकही करण्यात आली आहे. अशातच आता यापुढे भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्ग कठोर कारवाई केली जाणार आहे. एकनाथ शिंदेंच्या या सूचनेमुळे भेसळ करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोक्का काय आहे?

मोक्का म्हणजे म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999. हा कायदा खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी, बनावट वस्तूंचे रॅकेट, भेसळ, आर्थिक फसवणूक अशा संघटित टोळ्या किंवा गुन्हेगारी सिंडिकेट्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याअंतर्ग गुन्हा सिद्ध झाल्यास किमान 5 वर्षे तुरुंगवास ते जन्मठेप अशी शिक्षा होते.

म्हत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास त्याला अटकपूर्व जामीन मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला थेट अटक केली जाते. सामान्य गुन्ह्यांपेक्षा मोक्कामध्ये तपासासाठी अधिक वेळ दिला जाऊ शकतो. आरोपपत्र दाखल करण्याची मुदत काही प्रकरणांत 180 दिवसांपर्यंत वाढवली जाऊ शकते. त्यामुळे जर आता एखादा व्यक्ती भेसळ करताना आढळला तर त्याची चिंता वाढू शकते.

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ