AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलक आक्रमक, मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

राज्यभर मराठा आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. काही ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाने मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे.

मराठा आंदोलक आक्रमक, मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द
bus standImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 30, 2023 | 9:27 AM
Share

रणजित जाधव, पुणे | 30 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाकडून आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहा दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काहीच निर्णय झाला नाही. यामुळे काही ठिकाणी एसटीच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. मराठवाड्यात आंदोलन अधिकच तीव्र आहे. यामुळे पुणे शहरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. बसेस नसल्यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. खासगी वाहनाने त्यांना गावी जावे लागत आहे. अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे.

पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

राज्यात आरक्षण मागणीवरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मराठवाड्यात बीड लातूर जिल्ह्यात आंदोलक आक्रमक झाले आहे. पुणे शिवाजीनगर बसस्थानकावरुन मराठवाड्यातील अनेक भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारपासून बीड, लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस सेवा रद्द केली आहे. यामुळे पुणे शहरातून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अनेक नागरिकांना आपला प्रवास रद्द करावा लागला.

बसेसवर नेत्याचा फोटोला काळे फासले

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. एसटी महामंडळाच्या बसेवर असलेल्या जाहिरातीवरील नेत्यांच्या फोटोला काळे फासले गेले आहे. जोरदार घोषणाबाजी करत जाहिरातींवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे. जो पर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत गावात येणाऱ्या एसटीवर सरकारच्या जाहिरातींवरील नेत्यांच्या फोटोंना काळे फासण्यात येणार आहे, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.

लातूरवरुन सोडण्यात येणाऱ्या बसेस रद्द

लातूर बसस्थानकामधून सोडण्यात येणाऱ्या सर्व एसटी बसेसची सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहे. यामुळे अनेक प्रवासी बस स्थानकात अडकून पडले आहेत. लातूर शहर आणि ग्रामीण भागात सातत्याने आंदोलने सुरू आहे. यामुळे एसटीने खबरदारी म्हणून बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दुपार पासून ही बस सेवा बंद आहे. विशेष म्हणजे लातूरकडे येणाऱ्या बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?