
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानसोबतचा व्यापर देखील बंद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावर आहे. भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये औषधांचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.
भारत -पाकिस्तान युद्धाबाबत आता प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या 36 तासांमध्ये भारत -पाकिस्तान युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताला शनी तिसरा आहे. भारताची रास मकर आहे. भारताची साडेसाती 29 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे भारताचे ग्रह अनकुल असल्याचंही भगरे यांनी म्हटलं आहे.
युध्द झाले तर त्यामध्ये भारताची बाजू वरचढ आहे. मे महिन्यात तीन ग्रह बदलणार आहेत त्यामुळे दोन देशामध्ये मोठा उत्पाद घडण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होणार आहे. पाकिस्तानचा काही भूभाग आपल्याकडे येण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे येत्या 36 तासांमध्ये सीमेवर भारत पाकिस्तानमध्ये युध्दाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले तर ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणता येईल, अशी भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी वतर्वली आहे. एवढंच नाही तर त्यांनी सध्या झालेल्या ग्रहस्थितीबाबत देखील माहिती दिली आहे. भगरे गुरुजी यांनी मोठा दावा केला आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)