तीन महिन्यानंतर अतिवृष्टीच्या नुकसानीची घोषणा, मराठवाडा, विदर्भातल्या नुकसानीची कधी?

| Updated on: Oct 07, 2021 | 2:08 PM

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी अखेर राज्य सरकारनं 365 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी कोकण, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागात शेतीचं आणि घरांचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून आता मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

तीन महिन्यानंतर अतिवृष्टीच्या नुकसानीची घोषणा, मराठवाडा, विदर्भातल्या नुकसानीची कधी?
cm uddhav thackeray
Follow us on

मुंबई : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी अखेर राज्य सरकारनं 365 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी कोकण, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागात शेतीचं आणि घरांचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून आता मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सप्टेंबरच्या अखेरिस विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून कधी मदत दिली जाणार? असा सवाल केला जातोय. (Government announced financial assistance to farmers for the damage caused by heavy rains in July)

सप्टेंबरच्या अखेरिस संपूर्ण मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडिद, ऊसासह फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी पात्र सोडल्यानं शेतजमीनही वाहून गेली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. त्यासाठी पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडला जाऊ नये, अशी मागणी विरोधकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

जुलै महिन्यात झालेल्या नुकसानापोटी मदत जाहीर

राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळणार आहे. तरी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

कोणत्या विभागाला किती मदत?

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

विभागीय आयुक्तांमार्फत जिल्ह्यांना निधी देण्याचे आदेश

अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात जात पाहणी केली होती. तेथील शेतकऱ्याशी संवाद साधून, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर बातम्या :

Ajit Pawar : अजित पवारांवर IT च्या धाडी, पार्थ पवार आणि बहिणींच्या कंपन्यांचीही चौकशी

श्रीनगरमध्ये सरकारी शाळेवर दहशतवादी हल्ला! सर्वासामान्य नागरिकांवर गोळीबार, 2 शिक्षकांचा मृत्यू

Government announced financial assistance to farmers for the damage caused by heavy rains in July