AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधी समाजासाठी मोठा निर्णय, अखेर ‘ते’ आश्वासन पूर्ण!

राज्य सरकारने सिंधी समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजासाठी हा निर्णय लागू असेल.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधी समाजासाठी मोठा निर्णय, अखेर 'ते' आश्वासन पूर्ण!
| Updated on: Apr 08, 2025 | 3:45 PM
Share

राज्यातील सिंधी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. मात्र हे प्रश्न मुख्य प्रवाहात आले नाहीत. सिंधी समाजाने आतापर्यंत सरकारकडे अनेक मागण्या केलेल्या आहेत. आता सरकारने याच मागण्यापैकी एका मागणीकडे गंभीर्याने लक्ष घातलं आहे. सरकारने आता फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजाकडे असलेली घरे आणि आस्थापना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधी विस्थापितांसाठी अभय योजना

राज्य मंत्रिमंडळाची आज (8 एप्रिल) बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातच सिंधी समाजाविषयीही एक निर्णय घेतला आहे. सरकारने सिंधी विस्थापितांसाठी अभय योजना आणली आहे. ही योजना महसूल विभागाअंतर्गत राबवली जाईल. या योजनेअंतर्गत सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष धोरण राबवले जाईल. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

1947 साली फाळणीत जे विस्थापित झाले, अशा सिंधी समाजाच्या राज्यात एकूण 30 वसाहती आहेत. नागपूर, जळगाव, मुंबई इथे या वसाहती आहेत. या वसाहती कायदेशीर नाहीत. या सर्व वसाहती क्लास वनमध्ये बदलण्यात येतील. त्यासाठी सरकारने सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण आणले आहे. सिंधी समाजाने ज्यावेळी जमीन घेतली, त्यावेळचे रेडी रेकनर दर व 10 टक्के इतर कर याप्रमाणे आजपासून सिंधी समाजाला ही घरे व आस्थापना अधिकृत करता येईल. आम्ही निवडणूक संकल्पनाम्यात हे वचन दिले होते. ते आज पाळले आहे. आजपासून सिंधी समाजाला ही घरे व आस्थापना अधिकृत करता येईल. यातून फक्त उल्हासनगर वगळलेले आहे. उल्हासनगरसाठी वेगळे धोरण आखले जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

सरकारी बांधकामासाठी आता कृत्रिम वाळू

दरम्यान, मंत्रिमंडळात इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकार आता येथून पुढे कोणत्याही शासकीय बांधकामासाठी कृत्रिम वाळू वापरणार आहे. या वाळूला एम सँड असे म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेला वाळू उपलब्ध झाली पाहिजे, असे सरकारचे मत असून त्यासाठी जे जे स्त्रोत आहे, ते उपल्बध केले जातील.

राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रशर सुरू करणार

एम सँड अर्थात कृत्रिम वाळू देण्यासाठी सरकारतर्फे धोरण तयार केले जात आहे. सरकारी व सार्वजनिक बांधकामात ही कृत्रिम वाळू वापरली जाईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रशर सुरु केले जातील. दगडापासून वाळू तयार करण्याचे हे धोरण असेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे घरकुलांसाठी एकूण 5 ब्रास वाळू मोफत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.