Nanded: गाडीपुरा भागात रात्री दगडफेक, दोघे गंभीर जखमी, घरांचे नुकसान, 13 अटकेत, नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता

गाडीपुरा भागात उसळलेल्या वादात काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली. काहींनी विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर फोडला. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर परिसरातील घरांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

Nanded: गाडीपुरा भागात रात्री दगडफेक, दोघे गंभीर जखमी, घरांचे नुकसान, 13 अटकेत, नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता
नांदेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता

नांदेडः शहरातील गाडीपुरा भागात किरकोळ वादातून रात्री मोठी दगडफेक (Stone Throwing) झाली. या दगडफेकीमुळे दोघे जण जखमी झालेत. या दगडफेकीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. दोन गटातील परस्पर वादामुळे हा प्रकार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी जमलेल्या तरुणांमध्ये मारहाण तसेच बाचाबाची झाली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले तर दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींवर रात्रीच रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस (Nanded Police)  या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

विद्युतपुरवठा करणारा ट्रान्सफार्मर फोडला

गाडीपुरा भागात उसळलेल्या वादात काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली. काहींनी विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर फोडला. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर परिसरातील घरांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्री दगडफेक करणाऱ्यांना ओळखणे कठीण होते. त्यामुळे रात्रीतून पोलिसांना फार कारवाई करता आली नाही. मात्र आज सकाळी पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक केली आहे.

23 आरोपींपैकी 13 जणांना अटक

गाडीपुरा भागात रात्री दगडफेक करणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ वादानंतर या घटनेचे मोठ्या हिंसेत रुपांतर झाले होते. दगडफेकीत दोघे गंभीर जखमी झाले तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. या दगडफेकीत घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

इतर बातम्या-

Nashik | मालेगावमध्ये डॉक्टरचे घर फोडले, 12 लाखांची चोरी; माणिक-मोती, हिरे, हिरव्या पाचूच्या दागिन्यांवर डल्ला

Chandrapur Murder | डोक्यात जोरदार प्रहार, 35 वर्षीय महिलेची नदीकाठी हत्या, तीन मुलं पोरकी


Published On - 12:59 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI