MPSC आंदोलनाला मोठे यश, मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांची मोठी घोषणा, तुकाराम मुंढे यांच्याकडे मोठी जबाबदारी

एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आता या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या अध्यक्ष पदी आयएएस ऑफीसर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे.

MPSC आंदोलनाला मोठे यश, मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांची मोठी घोषणा, तुकाराम मुंढे यांच्याकडे मोठी जबाबदारी
mpsc student pune protest - rohit pawar and minister shivendrasinhraje
| Updated on: Oct 11, 2026 | 11:16 PM

एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आता या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या सचिव पदी आयएएस ऑफीसर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे.  MPSC आंदोलनाबाबत रोहित पवार, मंत्री शिवेंद्रराजेंमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरु होती. सायंकाळी उशीरा मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन मंत्री शिवेंद्रसिंह राजे आले आणि त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

सर्व उपोषण आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी मित्र, मुलामुलींना माझा मनापासून नमस्कार, समितीचे सहकारी यांचे आपण आभार मानतो, आणि समोर येण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानतो असे शिवेंद्रसिंह राजे यांनी यावेळी सांगितले. रोहित दादांनी सांगितले की तुम्हाला सांगितले की कोणीही वेडेवाकडे बोलायचे आहेत. एकामेकांचे शब्द कोणाला वाईट वाटणार नाहीत, कारण, आपण सर्व मराठी आहोत. आपण येथे जगणार आहोत आणि येथे जाणार आहोत. त्यामुळे मला तुमचे काही वाईट वाटणार नाही असेही मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले.

Loading...

मंत्री शिवेंद्रसिंह राजे म्हणाले की, एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात नेमलेल्या समितीचे सचिव म्हणून तुमच्या मागणीनुसारचे आयएएस तुकाराम मुंढे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या समितीतीत न्यायाधीशांची आणि तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. यामुळे तुमची एक मोठी मागणी पूर्ण झाल्याची आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले, त्याचे विद्यार्थ्यांनी उत्साहाच्या भरात जोरदार घोषणा करीत स्वागत केले. एमपीएससी पेपर फुटी  चौकशी आयोगाचे  सचिव म्हणून तुकाराम मुंढे, सेवा निवृत्त पोलिस लखीम गौतम,  माजी न्यायाधीश धनेश पाटील, माजी न्यायाधीश पी.डी. नाईक आणि आयोगाचे अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती दिलीपजी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सन्मानिय रोहित दादा, विश्वजित कदम, शासन आणि मुख्यमंत्री एमपीएससीच्या प्रश्नांसंदर्भात सुरुवातीपासूनच सकारात्मक होते. आपण ज्या- ज्या मागण्या वेळोवेळी केल्या त्या सीएम साहेबांकडे मांडल्या गेल्या, आणि त्यातूनच हा प्रस्ताव मी तुमच्यासमोर आल्याचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले.

आंदोलन मिटणार की नाही ?

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. आमदार रोहित पवार हे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.  या दोन नेत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारचा मुसदा घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विद्यार्थ्यांची महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे विवेक भीमनवार यांचा राजीनामा, त्याबद्दल काय निर्णय घेतला जाणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे. यावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मिठणार की नाही हे ठरणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us