AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही नगर परिषद निवडणुकांना अचानक स्थगिती, असीम सरोदे यांचं ते ट्विट चर्चेत, केली मोठी मागणी

राज्यातील काही नगर परिषद निवडणुकांना निवडणूक आयोगाकडून अचानक स्थगिती देण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर आता वकील असीम सरोदे यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांनी या संदर्भात मोठी मागणी केली आहे.

काही नगर परिषद निवडणुकांना अचानक स्थगिती, असीम सरोदे यांचं ते ट्विट चर्चेत, केली मोठी मागणी
असीम सरोदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 4:42 PM
Share

राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीच्या प्रचाराला काही तास शिल्लक असतानाच रविवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही नगर परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, यामध्ये काही ठिकाणी संपूर्ण नगर परिषदेच्याच निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली आहे, आता निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार राज्यात ज्या -ज्या ठिकाणी अशी स्थगिती देण्यात आली आहे, त्या ठिकाणी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत मोठी मगाणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले असीम सरोदे? 

नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा 20 डिसेंबर रोजी होणार. या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे की 2 डिसेंबर ला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायतीचे निकाल लगेच 3 डिसेंबर जाहीर न करता सगळे निकाल 21 डिसेंबर ला जाहीर करावे. तसे करणे पारदर्शक व मोकळ्या वातावरणात प्रामाणिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी या निवडणूक आयोगाच्या कायदेशीर बंधनकारक जबाबदारीचा भाग आहे.’ असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.

भाजपचीही नाराजी 

दरम्यान निवडणूक आयोगानं अचानक निवडणुका पुढे ढकलल्यानं यावर भाजपने देखील नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हे चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अचानक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं संबंधित उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहालया मिळत आहे.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?